Fact Check: PM मोदींनी गणेश मूर्ती नाकारल्याचा दावा दिशाभूल करणारा; हा पाहा पूर्ण व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 03:44 PM2024-03-29T15:44:09+5:302024-03-29T15:49:17+5:30

Fact Check: एका व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश मूर्ती नाकारल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हा व्हिडीओ अपूर्ण व्हायरल केल्याचे समोर आले आहे.

Fact Check Claim of PM Modi rejecting Ganesha idol misleading Watch the full video here | Fact Check: PM मोदींनी गणेश मूर्ती नाकारल्याचा दावा दिशाभूल करणारा; हा पाहा पूर्ण व्हिडीओ

Fact Check: PM मोदींनी गणेश मूर्ती नाकारल्याचा दावा दिशाभूल करणारा; हा पाहा पूर्ण व्हिडीओ

CreatedByन्यूजचेकर

Translated By : ऑनलाइन लोकमत

लोकसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षातील नेत्यांनी जोरदार तयारी सुरू आहे. मोठ्या नेत्यांचे देशभर दौरे सुरू आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' काही दिवसापूर्वीच संपली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे. दरम्यान, पीएम मोदी यांचा एका कार्यक्रमातील ११ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या व्हिडीओत पंतप्रधान मोदी श्री गणेश मूर्ती स्विकारण्यास विरोध करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या व्हिडीओबाबत खरे, खोटे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता हा व्हिडीओ अपूर्ण व्हायरल केल्याचे समोर आले आहे. 

११ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये पीएम मोदी एका मंचावर दिसत आहेत, त्या ठिकाणी एक व्यक्ती मोदींना श्री गणेशाची मूर्ती देण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, मोदी त्या व्यक्तीला समोरून दूर जाण्याचे संकेत देतात आणि हात पुढे करतात. यावेळी मंचावर उभे असलेले इतर लोकही त्या व्यक्तीला मोदींपासून दूर जाण्याचे संकेत देताना दिसत आहेत. मोदींनी श्री गणेशमूर्ती मंचावर नेण्यास नकार दिल्याचा दावा पोस्टच्या माध्यमातून केला जात आहे.

इतर अनेक सोशल मीडिया पोस्ट येथे पाहा

Courtesy: X/@SandeepGuptaINC

वस्तुस्थिती 

या व्हिडीओचा तपास केला असता सुरुवातीला, आम्ही व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सची रिव्हर्स इमेज सर्च केली. परिणामी आम्हाला ३ मे २०२३ रोजी न्यूज 18 कन्नड YouTube चॅनेलवर एक व्हिडीओ सापडला. रिपोर्टनुसार, हा व्हिडीओ २०२३ मध्ये होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान अंकोला येथे मोदींनी आयोजित केलेल्या रॅलीचा आहे. सुमारे २ तासांच्या या व्हिडीओच्या सुरुवातीच्या भागात व्हायरल क्लिप पाहता येते.


Courtesy: YT/News 18 Kannada

संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या व्यक्तीकडून श्री गणेशाची मूर्ती स्वीकारल्याचे दिसून येते.

३ मे २०२३ रोजी हा व्हिडीओ भाजपाच्या यूट्यूब चॅनलवरूनही प्रसारित करण्यात आला होता. तिथेही २ मिनिटे ३० सेकंदात पीएम मोदी गणेशाची मूर्ती स्वीकारताना दिसत आहेत.

Courtesy: YT/Bhartiya Janta Party

- आमच्या तपासणीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा व्हिडीओ जवळपास एक वर्ष जुन्या व्हिडीओचा अपूर्ण भाग खोट्या दाव्यांसह शेअर केला जात असल्याचे समोर आले आहे.

निकाल - गहाळ संदर्भ

स्रोत-

३ मे२०२३ रोजी न्यूज 18 कन्नडने व्हिडिओ शेअर केला.


३ मे २०२३ रोजी भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत Youtube चॅनेलद्वारे शेअर केलेला LIVE व्हिडिओ.

(सदर फॅक्ट चेक न्यूजचेकर या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.)

Web Title: Fact Check Claim of PM Modi rejecting Ganesha idol misleading Watch the full video here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.