कॉमेडियन समय रैनाने KBCमध्ये अमिताभ यांच्यासमोर खरंच रेखाचं नाव घेऊन जोक केला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 12:49 IST2025-02-07T12:42:00+5:302025-02-07T12:49:53+5:30

Fact Check Samay Raina KBC Rekha Joke Viral Video : 'कौन बनेगा करोडपती' शो मधील सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा डीपफेक म्हणजेच बनावट असल्याचे समोर आले आहे. जाणून घ्या सत्य.

Fact Check comedian Samay Raina Viral Video cracking rekha joke in front of Amitabh Bachchan on KBC is False Deep Fake | कॉमेडियन समय रैनाने KBCमध्ये अमिताभ यांच्यासमोर खरंच रेखाचं नाव घेऊन जोक केला?

कॉमेडियन समय रैनाने KBCमध्ये अमिताभ यांच्यासमोर खरंच रेखाचं नाव घेऊन जोक केला?

Claim Review : 'कौन बनेगा करोडपती' शो मधील समय रैना आणि अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे
Claimed By : Social Media User
Fact Check : चूक

Created By: the quint
Translated By: ऑनलाइन लोकमत

लोकप्रिय टीव्ही शो कौन बनेगा करोडपतीच्या (KBC) स्पेशल एपिसोडमध्ये नुकताच कॉमेडियन समय रैना येऊन गेला. त्या शो मधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. या व्हिडीओमध्ये शो चे होस्ट महानायक अमिताभ बच्चन समोर बसलेले असताना समय रैना एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्याबद्दल विनोद करतो आणि त्या विनोदावर खुद्द बीग बी देखील खो-खो असतात. हा व्हिडीओ व्हायरल केला जात असून हा व्हिडीओ KBC शो मधील असल्याचा दावा केला जात आहे.

व्हिडीओतील नेमका दावा काय?

व्हिडिओमध्ये समय रैना हा अमिताभ बच्चन यांना विचारतो की मी जोक करू शकतो का, ज्यावर बच्चन सहमती देतात. समय रैना पुढे म्हणतो, "तुमच्यात आणि वर्तुळात काय साम्य आहे? तुमच्यापैकी कुणाकडेही रेखा नाही." हिंदीतील रेखा (रेष) या शब्दावर कोटी करत या जोकमध्ये अभिनेत्री रेखा यांच्याशी हा विनोद कनेक्ट केलेला दिसतो.

या पोस्टचा संग्रह येथे पाहता येईल. ही क्लिप शेअर करणाऱ्या आणखी पोस्ट्सच्या संग्रहित आवृत्त्या येथे आणि येथे पाहू शकता.)

हा व्हिडीओ खरा आहे का?

हा व्हिडीओ खरा नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर करून हा व्हिडिओ बदलण्यात आला आहे. कौन बनेगा करोडपतीच्या एपिसोडमध्ये समय रैनाने हा विनोद केला नव्हता.

सत्य पडताळणी

आम्ही सोनीलिव्हवर (Sony LIV) 'इन्फ्लुएंसर स्पेशल' म्हणून ओळखला जाणारा संपूर्ण एपिसोड पाहिला, जिथे केबीसी स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे. कॉमेडियन आणि कंटेंट क्रिएटर तन्मय भटसोबत गेम खेळणाऱ्या समय रैनाने ३१ जानेवारी २०२२५ रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये बच्चन यांचे चित्रपट, शो आणि स्वतःच्या बालपणाशी संबंधित अनेक विनोद केले. मात्र, संपूर्ण एपिसोडमध्ये अभिनेत्री रेखाचा उल्लेखही आम्हाला आढळला नाही.

ही क्लिप स्वतंत्रपणे अपलोड करण्यात आली आहे की नाही हे पाहण्यासाठी आम्ही सोनी लिव्ह आणि सेट इंडियाच्या यूट्यूब चॅनेलवरही गेलो, परंतु कोणत्याही चॅनेलने व्हायरल झालेली क्लिप प्रसारित केलेली नाही. काही दाव्यांवर 'ब्रेन.रॉट.इंडियन' वॉटरमार्क असल्याचे लक्षात येताच आम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे युजरनेम सर्च केले.

या सर्च मुळे आम्हाला याच नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवर नेण्यात आले, ज्याने २ फेब्रुवारी रोजी ही क्लिप शेअर केली होती आणि ही बातमी लिहिण्यापर्यंत दोन कोटींहून अधिक व्ह्यूज मिळवले होते. तो 'AI इन्फो' टॅगसह शेअर करण्यात आला होता, ज्यावर टॅप केल्यावर अकाऊंटने त्यांच्या पोस्टमध्ये एआय लेबल जोडले असल्याचे म्हटले होते. आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करून व्हिडिओला बदल करण्यात आल्याचे यावरून दिसून आले.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये 'AI' हा हॅशटॅगही होता. कॅप्शनमध्ये आम्हाला '#ai' दिसला.

ही क्लिप खरी असल्याचा कोणताही पुरावा आम्हाला सापडला नसल्याने आम्ही ती हायव्ह मॉडरेशनच्या एआय डिटेक्शन टूलद्वारे सर्च केली. तसेच बेंगळुरूस्थित स्टार्टअप कॉन्ट्रेल्स डॉट एआयच्या टूलवर ही क्लिप सबमिट केली. हायव्ह मॉडरेशनच्या विश्लेषणात व्हिडिओ एआय-जनरेट असण्यावर ९९ टक्के आणि एआय वापरून तयार करण्यात येत असलेल्या ऑडिओबद्दल ९४ टक्के खात्री दिसून आली. हायव्ह मॉडरेशनने हा व्हिडिओ डीपफेक असल्याचा खात्रीलायक निकाल दिला.

त्याचप्रमाणे, कॉन्ट्रेल्स डॉट एआयच्या अहवालात असेही नमूद केले आहे की ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही "बनावट" आहेत. "ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये एआय मॅनिपुलेशनची स्पष्ट चिन्हे आहेत," असे नमूद केले आहे. व्हॉइस क्लोनिंग किंवा रूपांतरण तंत्राचा वापर करून रैनाचा आवाज जुळवण्यात आला आहे. व्हिडिओ घटकासाठी, अहवालात म्हटले आहे की त्यांच्या टूलने "स्पष्ट एआय मॅनिपुलेशन"चा निष्कर्ष काढला आहे आणि "फ्रेममधील ओठांवर क्लोन आवाज देण्यासाठी लिपसिंक तंत्राचा वापर केला गेला आहे."

निष्कर्ष: केबीसीमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासमोर विनोद करताना समय रैनाने रेखा यांचा केलेला उल्लेख हा एक डीपफेक व्हिडिओ आहे.

(सदर फॅक्ट चेक the Quint या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

Web Title: Fact Check comedian Samay Raina Viral Video cracking rekha joke in front of Amitabh Bachchan on KBC is False Deep Fake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.