महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 04:25 PM2024-11-15T16:25:10+5:302024-11-15T16:25:47+5:30

Fact Check: या व्हिडीओमध्ये बुलडोझरवर चढून प्रचार करणारी व्यक्ती योगी आदित्यनाथ असल्याचा दावा केला जात आहे.

Fact Check Did Yogi Adityanath really campaign by climbing on a bulldozer in Maharashtra read in detail | महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य

महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य

Claim Review : व्हायरल पोस्टमध्ये बुलडोझरवर चढून प्रचार करणारी व्यक्ती योगी आदित्यनाथ असल्याचा दावा आहे.
Claimed By : Social Media User
Fact Check : चूक

Created By: The Quint
Translated By: ऑनलाइन लोकमत

Yogi Adityanath, Fact Check: महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचा हंगाम सुरु आहे. दररोज उमेदवार नवनव्या प्रकाराने प्रचार करताना दिसत आहेत. काही उमेदवार हटके प्रचार करतानाही दिसतात. सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात भगवे कपडे परिधान केलेली एक व्यक्ती बुलडोझरच्या वर उभी राहून गर्दीकडे हात हलवून अभिवादन करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. यासोबतच आणखी एक व्यक्ती गळ्यात भाजपाचे उपरणे घालून जमावाच्या दिशेने अभिवादन करत आहे.

दावा काय?

व्हायरल पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या व्हिडीओमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील सभेत अशाप्रकारे प्रचार केल्याचे दिसते. युजरने लिहिले आहे की, बुलडोझरशी योगींचे नाते दृढ होताना दिसतेय आणि लोकांचा विश्वास सार्थ ठरवणे हीच योगीजींची ओळख आहे.

अर्काईव्ह पोस्टसाठी येथे क्लिक करा. तसेच, अशाच आशयांच्या पोस्ट येथे आणि येथे सापडतील.

सत्य पडताळणी

सत्य पडताळणीत लक्षात आले की हा व्हिडिओ भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्या अकोल्यातील मूर्तिजापूर येथील सभेचा आहे. पक्षाच्या एका कार्यकर्त्याने आदित्यनाथ यांच्यासारखा भगवा पोशाख परिधान केला होता आणि रॅलीत बुलडोझरवर उभा होता, अशी माहिती उमेदवार आणि एका पत्रकाराने 'द क्विंट'ला दिली. अधिक शोध घेण्यासाठी व्हिडिओतील स्क्रीनशॉट्सना गुगल रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिले. 

त्यावेळी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एका युजरने केलेली पोस्ट दिसली, ज्यात म्हटले होते की, योगींसारखाच गेटअपमधील एक कार्यकर्ता व चाहता बुलडोझरवर चढला होता.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, आदित्यनाथ यांच्या डुप्लिकेटने अकोल्यात भाजप उमेदवाराचा प्रचार केला होता.

त्यानंतर आम्ही राज्यातील एका पत्रकाराशी संपर्क साधला असता. त्यांनी हे दृश्य मूर्तिजापूर येथील भाजपचे हरीश पिंपळे यांच्या सभेचे असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसारखा दिसणारा एक चाहता यावेळी उपस्थित होता.

'द क्विंट'ने पिंपळे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला की, हे दृश्य त्यांच्या रॅलीतील आहे, ज्यात शंभू धुळे नावाच्या पक्षाच्या कार्यकर्त्याने आदित्यनाथ यांच्यासारखे कपडे परिधान केले होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ६ नोव्हेंबर रोजी आपल्या मतदारसंघात पिंपळे यांच्यासाठी प्रचार केला होता. त्याचे फोटोही आपल्या एक्स पेजवर अपलोड केली. पण बुलडोझर उभा असलेला व्यक्ती आदित्यनाथ नव्हते.

निष्कर्ष: योगी आदित्यनाथ यांनी बुलडोझरवरून महाराष्ट्रात प्रचार केल्याचा दावा खोटा आहे.

(सदर फॅक्ट चेक द क्विंट मराठी या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

 

Web Title: Fact Check Did Yogi Adityanath really campaign by climbing on a bulldozer in Maharashtra read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.