Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 03:32 PM2024-11-20T15:32:49+5:302024-11-20T15:35:27+5:30
Fact Check : रोहित शर्मा पुन्हा एकदा बाबा झाला आहे. पत्नी रितिका हिने १५ नोव्हेंबरला गोंडस मुलाला जन्म दिला. या संदर्भात सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत.
Created By: आजतक
Translated By: ऑनलाइन लोकमत
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा बाबा झाला आहे. पत्नी रितिका हिने १५ नोव्हेंबरला गोंडस मुलाला जन्म दिला. या संदर्भात सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोमध्ये रोहित आणि रितिका एका बाळासोबत दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत नवजात बाळ हॉस्पिटलच्या पाळण्यात दिसत आहे. रोहितच्या बाळाचे हे फोटो असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
शेकडो लोकांनी या फोटोंमध्ये दिसणारं बाळ रोहित शर्माचं असल्याचं समजून ते फोटो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पण आज तक फॅक्ट चेकमध्ये हे दोन्ही फोटो रोहित शर्माच्या मुलाचे नसल्याचं आढळून आलं आहे.
पहिला फोटो
हा फोटो रिव्हर्स सर्च केल्यावर आम्हाला तो 'Te extraño' नावाच्या फेसबुक पेजच्या पोस्टमध्ये सापडला. इतर काही नवजात बाळांचे फोटो देखील पोस्टमध्ये आहेत. येथे कॅप्शन स्पॅनिशमध्ये लिहिलं आहे. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही पोस्ट ५ नोव्हेंबरची आहे आणि रोहित शर्माच्या मुलाचा जन्म १५ नोव्हेंबरला झाला.
यावरून हे सिद्ध होतं की, फोटो हा रोहितच्या मुलाचा असू शकत नाही कारण तो इंटरनेटवर आधीच उपलब्ध आहे.
याशिवाय 'हेलन सेलर' नावाच्या युजरने हा फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म Pinterest वर पोस्ट केला आहे. फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये Grandson म्हणजेच त्याचा नातू असं लिहिलं आहे.
दुसरा फोटो
यासोबतच युजरने नवजात बाळासोबतचे आणखी काही फोटोही शेअर केले आहेत. व्हायरल फोटोमध्ये दिसणारे बाळ या युजरच्या कुटुंबातील असण्याची शक्यता आहे. याची पुष्टी करण्यासाठी आम्ही युजर्सशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे.
तिसरा फोटो
या फोटोमध्ये रोहित ज्या बाळाला घेऊन बसलेला दिसत आहे, ती त्याची मुलगी समायरा आहे. ३० डिसेंबर २०१९ रोजी समायराच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी रोहितची पत्नी रितिका हिने स्वत: इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला होता. यावरून हा फोटोही रोहित-रितिका यांच्या मुलाचा नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
(सदर फॅक्ट चेक आजतक या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)