Fact Check : ५०० रुपयांच्या नव्या नोटांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो? जाणून घ्या नेमकं 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 14:12 IST2024-12-26T14:11:44+5:302024-12-26T14:12:49+5:30
Fact Check : सोशल मीडिया युजर्स सध्या ५०० रुपयांच्या नोटेचा फोटो शेअर करत आहेत आणि दावा करत आहेत की, यावेळी भारतीय जनता पार्टी (भाजपा) सरकार डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ५०० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई करणार आहे.

Fact Check : ५०० रुपयांच्या नव्या नोटांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो? जाणून घ्या नेमकं 'सत्य'
Created By: Vishvas News
Translated By: ऑनलाईन लोकमत
सोशल मीडिया युजर्स सध्या ५०० रुपयांच्या नोटेचा फोटो शेअर करत आहेत आणि दावा करत आहेत की, यावेळी भारतीय जनता पार्टी (भाजपा) सरकार डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ५०० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई करणार आहे.
विश्वास न्यूजने केलेल्या या तपासात हा दावा खोटा असल्याचं आढळून आलं असून या दाव्यासह व्हायरल होणारा फोटो AI टूलच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. नोटाबंदीपासून देशात महात्मा गांधी सीरीजच्या नोटा चलनात आहेत आणि त्यात कोणत्याही बदलाची किंवा प्रस्तावित बदलाची कोणतीही माहिती नाही.
काय होतंय व्हायरल?
सोशल मीडिया युजर '@MukeshMohannn' ने व्हायरल पोस्ट (अर्काइव्ह लिंक) शेअर करताना लिहिलं की, ऐकण्यात आलं आहे की, यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा ५०० रुपयांच्या नोटेवर बाबासाहेबांचा फोटो छापणार आहे."
सुनने में आ रहा है कि BJP इस बार, बाबा साहेब डॉ अंबेडकर के जन्मदिवस पर, बाबा साहेब की तस्वीर 500 के नोट पर छापने वाली है pic.twitter.com/C2OPfPTcct
— Mukesh Mohan (@MukeshMohannn) December 19, 2024
इतरही अनेक युजर्सनी हा फोटो शेअर केला आहे.
तपास
५०० रुपयांच्या व्हायरल झालेल्या नोटेवर डॉ. भीमराव आंबेडकर यांचा फोटो आहे, तर नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने १०, २०, ५०, १००, २००, ५०० रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या आहेत.
आरबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, सध्या चलनात असलेल्या ५०० रुपये, २०० रुपये, १०० रुपये, ५० रुपये, २० रुपये आणि १० रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो आहे.
(Sourcepaisaboltahai.rbi.org.in)
महात्मा गांधी सीरीजमधील नवीन नोटांमध्ये विशेषत: ५०० रुपयांच्या नोटांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आम्हाला या संदर्भात सभागृहात विचारलेला कोणताही प्रश्न आढळला नाही, ज्यामध्ये महात्मा गांधी सीरीजमधील नोट्समध्ये कोणत्याही बदलासाठी कोणतीही माहिती किंवा प्रस्तावाचा उल्लेख होता. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आंबेडकर वादावरून चांगलाच गदारोळ झाला होता हे लक्षात घेण्यासारखे आहे.
आरबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, ५०० रुपयांच्या नव्या सीरिजच्या नोटेच्या पुढच्या बाजूला महात्मा गांधींचा फोटो आहे, तर मागच्या बाजूला लाल किल्ल्याचं चित्र आहे.
(Source-https://paisaboltahai.rbi.org.in/)
(Source-https://paisaboltahai.rbi.org.in/)
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेने बँकिंग कायदा विधेयक मंजूर केलं आहे. यानंतर आम्ही एआय डिटेक्टर टूलच्या मदतीने ५०० रुपयांच्या व्हायरल नोटांचा फोटो तपासला.
ट्रू मीडिया टूलच्या एनालिसिस रिपोर्टमध्ये फोटोमध्ये मॅनिप्युलेशन केल्याचं समोर आलं. रिपोर्टमध्ये हा फोटो स्टेबल डिफ्यूजन, मिड-जर्नी आणि डेल ई-2 सारख्या टूलच्या मदतीने तयार केला गेल्याची शक्यता आहे आणि AI द्वारे तयार होण्याच्या शक्यतेचा स्कोअर ९९% आहे.
एनालिसिस रिपोर्ट येथे पाहा
व्हायरल झालेल्या फोटोबाबत आम्ही आरबीआयशी संपर्क साधला आणि आम्हाला सांगण्यात आलं की, नोटांबाबत कोणतेही बदल आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येतील.
बँकेच्या नोटांमध्ये करावयाच्या बदलांबाबत आम्हाला अशी कोणतीही माहिती आरबीआयच्या वेबसाइटवर आढळली नाही किंवा कोणत्याही बातम्यांमध्ये ही माहिती देण्यात आली नाही. RBI ने जारी केलेले नवीनतम प्रकाशन ६ डिसेंबर रोजीच आहे.
उल्लेखनीय आहे की, अयोध्येतील राम मंदिर अभिषेक सोहळ्यापूर्वी असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि असा दावा करण्यात आला होता की, सरकार श्री राम सीरीजच्या ५०० रुपयांच्या नव्या नोटा जारी करणार आहे. विश्वास न्यूजला त्यांच्या तपासणीत हा दावा खोटा आढळला, ज्याचा तथ्य तपासणी अहवाल येथे वाचता येईल.
व्हायरल पोस्ट शेअर करणाऱ्या युजरला ट्विटवर ४६ हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. बिझनेस आणि फायनान्सशी संबंधित इतर बनावट दाव्यांची चौकशी करणारे फॅक्ट चेक रिपोर्टंस विश्वास न्यूजच्या बिझनेस सेक्शनमध्ये वाचता येतील.
निष्कर्ष: आंबेडकर वादाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर बाबासाहेब आंबेडकर सीरीजतील ५०० रुपयांच्या नोटा आल्याचा दावा खोटा असून या दाव्यासह व्हायरल होणारा फोटो AI ने तयार केला आहे. नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या महात्मा गांधी सीरीजतील केवळ नवीन नोटा चलनात आहेत आणि त्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत किंवा तसे काही प्रस्तावितही नाही.
(सदर फॅक्ट चेक Vishvas News या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)