Fact Check : माशानं गिळला अख्खाच्या अख्खा साप, बघा कशी लढवली शक्कल, Video
By स्वदेश घाणेकर | Updated: February 10, 2021 15:14 IST2021-02-10T15:14:07+5:302021-02-10T15:14:37+5:30
भारतीय वन्य अधिकारी सुसांता नंदा ( Susanta Nanda IFS ) यांनी बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला.

Fact Check : माशानं गिळला अख्खाच्या अख्खा साप, बघा कशी लढवली शक्कल, Video
भारतीय वन्य अधिकारी सुसांता नंदा ( Susanta Nanda IFS ) यांनी बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत एक मासा त्याच्याहून अधिक आकाराच्या सापाला गिळताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सुरुवातीपासून पाहिल्यास हा मासा तळ्याशेजारील एका बिळापाशी आला आणि त्यानं तोंडातून धूर त्या बिळाच्या दिशेनं फेकला. त्यानंतर काही वेळात बिळात असलेला साप सदृश जीव बाहेर आला आणि त्या माशानं त्याला गिळलं.... अवघ्या काहीवेळात हा व्हिडीओ व्हायरल झाला. इंग्लंडकडून पराभव अन् आता विराट कोहलीला आणखी एक धक्का
पाहा व्हिडीओ...
If you haven’t seen this pic.twitter.com/pNoSKBbHtv
— Susanta Nanda IFS (@susantananda3) February 10, 2021
यापूर्वीही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याचा आधार घेतल्यास आता व्हायरल झालेल्या व्हिडीओत माशानं गिळलेला जीव हा साप नसून इल मासा ( Eel Fish) आहे. एकाच जातीच्या जीवांना खाण्याच्या या प्रकाराला Cannibalism असे म्हणतात.
पाहा जुन्या व्हिडीओचे संपूर्ण फुटेज...