Fact Check: 'मोदी की गॅरंटी'ला चॅलेंज देणारा जशोदाबेन यांचा फोटो बनावट; सत्य जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 04:48 PM2024-04-18T16:48:01+5:302024-04-18T17:18:54+5:30

सोशल मीडियात निवडणुकीच्या काळात अनेक गोष्टी व्हायरल होतात. त्यात नुकतेच जशोदाबेन यांचा फोटो व्हायरल झाला असून त्यातून त्यांनी मोदी की गॅरंटी यावर प्रश्न उभा केल्याचा दावा करण्यात आला आहे. या फोटोचं सत्य जाणून घ्या

Fact Check: Jashodaben's photo challenging 'Modi Ki Guarantee' is fake; Know the truth | Fact Check: 'मोदी की गॅरंटी'ला चॅलेंज देणारा जशोदाबेन यांचा फोटो बनावट; सत्य जाणून घ्या

Fact Check: 'मोदी की गॅरंटी'ला चॅलेंज देणारा जशोदाबेन यांचा फोटो बनावट; सत्य जाणून घ्या

Created By: PTI
Translated By: ऑनलाइन लोकमत

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात अलीकडेच अनेक युझर्सने जशोदाबेन यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांनी हातात एक कागद पकडला असून त्यावर 'सबसे पहली गारंटी उसने...मुझे ही दी थी, बाकी आप समझदार' असं लिहिलेलं दिसतं. मात्र जेव्हा या फोटोची पडताळणी केली तेव्हा जशोदाबेन यांचा जुना फोटो चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं दिसून आले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोदी की गॅरंटी या घोषवाक्याखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळीकडे प्रचार करत आहेत. त्यात भाजपाच्या जाहीरनाम्यातही मोदी की गॅरंटी असा प्रचार केला आहे. सातत्याने भाजपा आणि पंतप्रधान मोदींकडून गॅरंटी या शब्दाचा वापर निवडणुकीच्या प्रचारात होत आहे. त्यातून लोकांनी दिलेली आश्वासने ही गॅरंटी असल्याचं सांगत प्रचार सुरू आहे.

काय दावा आहे?

एका फेसबुक युझरनं एप्रिल १६ रोजी जशोदाबेन यांनी हातात कागद पकडलेला, त्यावर 'सबसे पहली गारंटी, उसने मुझे दी थी, बाकी आप समझदार हो" असा उल्लेख असलेला फोटो पोस्ट केला.

पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा \ अर्काइव्ह लिंक

पडताळणीत काय आढळलं?

या व्हायरल फोटोची पडताळणी सुरू केली, सर्वात आधी हा फोटो गुगल लेन्समध्ये तपासला असता यासारखे अनेक फोटो इन्स्टाग्राम, फेसबुकवर पोस्ट केले होते. 

फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

गुगलवर याबाबत किवर्ड टाकून शोध घेतला असता ११ फेब्रुवारी २०१६ रोजी हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रकाशित झालेली बातमी समोर आली. या बातमीत व्हायरल होणाऱ्या फोटोसारखाच फिचर फोटो होता. त्यावर PM modi's wife files RTI, seeks details of his passport असं टायटल देण्यात आलं होते. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी गुरुवारी अहमदाबादमधील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात RTI अर्ज दाखल केला आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी पासपोर्ट मिळवण्यासाठी सादर केलेल्या विवाहाशी संबंधित कागदपत्रांची माहिती मागितली असं बातमीत लिहिलं होतं. 

ही बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याच फोटोच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलं होतं आहे: “जशोदाबेन यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पासपोर्ट नाकारण्यात आला कारण त्या लग्नाचे प्रमाणपत्र सादर करू शकल्या नाहीत.

खाली हे दोन फोटो दिलेले आहेत. 

२६ नोव्हेंबर २०१४ रोजी प्रकाशित झालेल्या द फर्स्टपोस्टने प्रकाशित केलेले वृत्तही पडताळणीत आढळले. त्यात वर नमूद केलेल्या बातम्यांप्रमाणेच फोटो होता.

या बातमीचं शिर्षक होतं,  “Inconveniently yours: Why PM Modi can't ignore Jashodaben anymore”

रिपोर्टनुसार, जशोदाबेन यांनी त्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल तपशील विचारला. त्यांनी गुजरातमध्ये राज्य सरकारकडे माहितीचा अधिकार (आरटीआय) अर्ज दाखल केला होता. 

बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यातून एक धागा पकडून विशिष्ट कीवर्डसह पुन्हा गुगलमध्ये शोध घेतला तेव्हा NDTV च्या अधिकृत चॅनेलद्वारे २५ नोव्हेंबर २०१४ रोजी अपलोड केलेला व्हिडिओ समोर आला.

व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असे लिहिले आहे की, जशोदा चिमन मोदी या नेहमीसारखं त्यांच्या गावातील मंदिरात जात होत्या, तेव्हा पिस्तूल घेऊन सिव्हिल ड्रेसमध्ये दोन सुरक्षा रक्षक त्यांच्या मागे होते. ६३ वर्षीय सेवानिवृत्त शालेय शिक्षिकेने काल एक अर्ज दाखल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी म्हणून त्यांना कोणत्या प्रकारच्या सुरक्षिततेचा हक्क आहे याची माहिती मागितली होती. 

हा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळे असा निष्कर्ष काढता येतो की, जशोदाबेन यांचा जुना फोटो चुकीच्या प्रकारे बदलला गेला आणि खोटा दावा करून सोशल मीडियावर अलीकडेच शेअर केला गेला.

दावा - जशोदाबेन यांच्या फोटोतून त्या मोदी की गॅरंटी याला आव्हान देत आहेत. 

नेमकं सत्य काय - जुना फोटो चुकीच्या पद्धतीने तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करून खोटा दावा केला गेला. 

निष्कर्ष  

अनेक सोशल मीडिया युझर्सने जशोदाबेन यांचा एक फोटो शेअर केला होता ज्यात लिहिले होते की, 'सबसे पहली गारंटी, उसने मुझे दी थी, बाकी आप समझदार हो", परंतु पडताळणीत जशोदाबेन यांचा हा जुना फोटो असून तो त्यात चुकीचा बदल करून तो खोट्या दाव्याने व्हायरल करण्यात आला. 

सदर फॅक्ट चेक 'PTI' या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.

Web Title: Fact Check: Jashodaben's photo challenging 'Modi Ki Guarantee' is fake; Know the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.