Fact Check: पंतप्रधान फ्री रिचार्ज योजनेच्या नावाखाली व्हायरल होणारा 'तो' मेसेज खोटा, जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 12:33 PM2024-12-02T12:33:12+5:302024-12-02T12:35:49+5:30
पंतप्रधान फ्री रिचार्ज योजनेतून भारतातील सर्व यूजर्सना ३ महिन्यांसाठी फ्री मोबाईल रिचार्ज द्यायला सुरुवात झाली आहे असं मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे.
नवी दिल्ली - सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात पंतप्रधान फ्री योजनेतून सर्व भारतीय युजर्सना ३ महिन्यासाठी फ्री मोबाईल रिचार्ज मिळत आहे. हा रिचार्ज ३० डिसेंबरपूर्वी करावा असा दावा करण्यात आला आहे. या पोस्टसोबत एक लिंक शेअर केली जातेय. ज्यावर क्लिक करून ८४ दिवसांचा फ्री रिचार्ज जाऊ शकतो असं मेसेजमध्ये सांगितले आहे.
विश्वास न्यूजच्या पडताळणीत व्हायरल दावा बनावट आढळला आहे. पंतप्रधान मोदींकडून अशाप्रकारे कुठलाही फ्री रिचार्ज दिला जात नाही. लोक चुकीची पोस्ट व्हायरल करत आहेत. कुठल्याही सोशल मीडिया युजर्सने अशा संशयित लिंक्सवर क्लिक करू नये.
काय आहे व्हायरल पोस्ट?
फेसबुक युजर Rushikesh Kale याने २७ नोव्हेंबर २०२४ रोजी व्हायरल पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, पंतप्रधान फ्री रिचार्ज योजनेतून भारतातील सर्व यूजर्सना ३ महिन्यांसाठी फ्री मोबाईल रिचार्ज द्यायला सुरुवात झाली आहे.
मीदेखील यातून माझं ८४ दिवसांचं फ्री रिचार्ज केले आहे. तुम्हीही खालील लिंकवर क्लिक करून ८४ दिवसांचे रिचार्ज मिळवू शकता.
(30 December 2024 पूर्वी)
पोस्टच्या (अर्काईव्ह) लिंकसाठी इथं क्लिक करा
पडताळणी काय आढळलं?
लिंकची सत्यता जाणून घेण्यासाठी रिसर्च टीमने दिलेल्या लिंक यूआरएलवर लक्ष दिले. त्यात आढळले की, पोस्टसोबत दिलेली लिंकचा URL हे techtadaka.com अशी आहे. ज्यावरून स्पष्टपणे ही अधिकृत वेबसाईट लिंक नाही हे दिसते.
त्यावर या योजनेबाबत गुगल किवर्डवर सर्च केले. त्यात कुठल्याही मीडिया रिपोर्टमध्ये अशाप्रकारच्या योजनेचा उल्लेख केल्याचे आढळले नाही.
व्हायरल पोस्टमध्ये जियो, एअरटेल, बीएसएनएल आणि अन्य कंपन्यांचे नाव लिहिलं आहे. जेव्हा या कंपन्यांचे सोशल मीडिया हँडल पडताळले तेव्हा तिथेही अशाप्रकारच्या कुठल्याही योजनेची माहिती मिळाली नाही.
याबाबत सायबर एक्सपर्ट किसलय चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकारच्या लिंकच्या माध्यमातून फसवणूक आणि खासगी माहिती चोरी करण्याच्या उद्देशाने बनवल्या असतात. अशा लिंकवर क्लिक करण्याआधी यूआरएल लक्षपूर्वक बघा, ज्या कुणाच्या नावाचा उल्लेख असेल तर त्यांचे सोशल मीडिया हँडल आणि वेबसाईट नक्की तपासा. याप्रकारच्या कुठल्याही लिंक्सवर क्लिक करून रिचार्ज करण्याऐवजी अधिकृत वेबसाईटवरून रिचार्ज करावा.
निष्कर्ष
याआधीही अनेकदा सोशल मीडियावर फ्री रिचार्जचे अनेक दावे व्हायरल झालेत. पंतप्रधान फ्री रिचार्ज योजनेच्या नावे व्हायरल होणारा मेसेज फेक आहे. पंतप्रधान मोदींकडून कुठलीही रिचार्ज योजना सुरू नाही. फसवणूक आणि खासगी माहिती चोरी करण्याच्या उद्देशाने अशा पोस्ट व्हायरल केल्या जातात. यूजर्सने अशा लिंकवर क्लिक करण्यापासून सावध राहिले पाहिजे.
(सदर फॅक्ट चेक विश्वास न्यूज या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)