Fact Check: नरेंद्र मोदींच्या आवाजात व्हायरल होणारं 'ते' गाणं त्यांनी गायलं नाही, तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 18:32 IST2025-01-24T18:24:20+5:302025-01-24T18:32:41+5:30
नरेंद्र मोदी यांच्या आवाजातील एक गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय, त्यात एका फेसबुक युजरने हे गाणे मोदींनीच गायल्याचा दावा केला आहे.

Fact Check: नरेंद्र मोदींच्या आवाजात व्हायरल होणारं 'ते' गाणं त्यांनी गायलं नाही, तर...
Created By: क्विंट हिंदी
Translated By: ऑनलाइन लोकमत
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी (Narendra Modi) सलामी देत असल्याचा एक फोटो आहे. बॅकग्राउंडमध्ये राज कपूर यांच्या चित्रपटाचे गाणे चालू आहे.
ही पोस्ट शेअर करून असा दावा केला जात आहे की, "गायक मुकेश यांच्या या गीताला भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपला आवाज दिला आहे.
(या पोस्टची आर्काइव्ह लिंक तुम्ही इथे, इथे आणि इथे पाहू शकता)
काय आहे सत्यता?
व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील दावा खोटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्यांच्या आवाजात हे गाणं गायलं नाही.
AI च्या मदतीने या गाण्यात पंतप्रधान मोदींशी मिळताजुळता आवाज जोडला गेला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या आवाजात बनलेले अशाप्रकारचे अनेक बनावट गाणी इंटरनेटवर उपलब्ध आहेत
कशी केली पडताळणी?
सर्वात आधी हा व्हिडिओ AI नं बनवलेला आहे का हे तपासण्यासाठी Contrails AI यावर अपलोड केला जेणेकरून हा व्हिडिओ एआयच्या मदतीने बनवला आहे की नाही हे माहिती पडेल.
Contrails AI नं या व्हिडिओत वापरण्यात आलेला ऑडिओ फेक असल्याचं सांगितले.
AI ने तयार केलेले फोटो आणि व्हिडिओ ओळखणाऱ्या एक अन्य टूल TrueMedia ने देखील या व्हिडिओमध्ये छेडछाड झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
यानंतर, यासंबंधित कीवर्ड्स इंटरनेटवर सर्च केल्यावर आम्हाला Modi Music Productions नावाच्या YouTube चॅनलवर हे गाणे सापडले.
या गाण्याच्या शीर्षकात लिहिले होते - 'मोदी - किसी की मुस्कुराहटों पर हो निसार (मोदी AI कवर)
Modi Music Productions नावाच्या या YouTube चॅनलची तपासणी केल्यावर आम्हाला आढळले की, या चॅनलवर AI च्या मदतीने तयार केलेले आणखीही म्युझिक व्हिडिओ उपलब्ध आहेत.
या चॅनलवर विशेषतः पंतप्रधान मोदींच्या AI च्या मदतीने तयार केलेल्या आवाजातून अनेक गाणी बनवली आहेत. सर्व शीर्षकांमध्ये AI कवर असा उल्लेख करण्यात आला आहे.
निष्कर्ष: व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील दावा चुकीचा असून तो AI ने तयार केलेला एक म्युझिक व्हिडिओ पीएम मोदी यांच्या आवाजात गाणं म्हणल्याचं सांगून शेअर केला जात आहे.
(सदर फॅक्ट चेक क्विंट हिंदी न्यूज या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)