Fact check : खरंच मनसे प्रमुख-नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवर एकाच मंचावर येणार? राज ठाकरेंनी दिले अपडेट्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 09:46 PM2024-04-18T21:46:26+5:302024-04-18T21:53:08+5:30
Raj Thackeray : राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवर एकाच मंचावर येणार असल्याची माहिती समोर आली होती.
काल मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी अमित ठाकरे यांनी पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमख राज ठाकरे एकाच मंचावर येणार असून शिवाजी पार्कवर सभा होणार आहे अशी माहिती दिल्याची बातमी समोर आली होती. याबाबत आता स्वत: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आता ट्विट करुन स्पष्टीकरण दिले आहे. ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, "काल एका वृत्तवाहिनीवर, अमितशी झालेल्या अनौपचारिक गप्पांचा दाखला देत, ‘राज ठाकरे आणि पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान एका व्यासपीठावर दिसणार अशी बातमी चालवली. मुळात अमितने असं कोणतंही विधान केलेलं नाही, असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
"अमित काल पुण्याच्या दौऱ्यावर होता आणि तिथे पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळेस अमितने वरील विधान केल्याचा दावा एकाच वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी केला. इतर कुठल्याच पत्रकाराने ही बातमी का नाही केली? तिथे इतरही अनेक पत्रकार होते पण कोणीच ही बातमी केली नाही, याचं कारण अमितने असं विधान केलंच नाही, असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.
"अनौपचारिक गप्पा या अनौपचारिकच ठेवायच्या असतात आणि त्यात न केलेली विधानं तोंडात कोंबायची नसतात हा संकेत असतो. असो. सर्व माध्यमांनी या बातमीकडे साफ दुर्लक्ष करावं, अशी विनंतीही राज ठाकरे यांनी केली आहे.
काल एका वृत्तवाहिनीवर, अमितशी झालेल्या अनौपचारिक गप्पांचा दाखला देत, ‘राज ठाकरे आणि पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान एका व्यासपीठावर दिसणार अशी बातमी चालवली.
— Raj Thackeray (@RajThackeray) April 18, 2024
मुळात अमितने असं कोणतंही विधान केलेलं नाही. अमित काल पुण्याच्या दौऱ्यावर होता आणि तिथे…
बातमी काय होती?
काल मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याची माहिती दिल्याची बातमी समोर आली होती.
राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यावेळी कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. त्यावेळी लवकरच प्रचारसभा घेणार असल्याचे सांगितले होते. यामुळे अमित ठाकरे यांनीही याबाबत माहिती दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या.