श्रेयस अय्यर-धनश्री वर्मा यांचे समुद्रकिनारी सुटी एन्जॉय करतानाचे फोटो 'AI-जनरेटेड'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 13:38 IST2025-03-07T13:33:01+5:302025-03-07T13:38:48+5:30

Shreyas Iyer Dhanashree Verma Viral Photos Fact Check: दोनही फोटो AI टूल्स वापरून तयार केल्याचे दिसून आले

fact check shreyas iyer dhanashree verma posing together viral images are ai generated | श्रेयस अय्यर-धनश्री वर्मा यांचे समुद्रकिनारी सुटी एन्जॉय करतानाचे फोटो 'AI-जनरेटेड'!

श्रेयस अय्यर-धनश्री वर्मा यांचे समुद्रकिनारी सुटी एन्जॉय करतानाचे फोटो 'AI-जनरेटेड'!

Created By: theQuint
Translated By: ऑनलाइन लोकमत

Shreyas Iyer Dhanashree Verma Viral Photos Fact Check: भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल याचा पत्नी धनश्री वर्मा हिच्याशी घटस्फोट झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. या दोघांनी याबाबत मौन बाळगले आहेत. पण त्याच दरम्यान, भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर आणि धनश्री वर्मा एकत्र पोज देताना दाखवणारे दोन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

(अर्काईव्ह पोस्ट)

हे फोटो खरे आहेत का?

अजिबात नाही. दोन्ही फोटो हे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) टूल्सच्या मदतीने तयार करण्यात आले आहेत.

  • आम्हाला आढळले की दोन्ही फोटोंमध्ये त्वचेचा पोत गुळगुळीत आहे, जे सामान्यतः एआय-जनरेटेड इमेजेस मध्ये दिसून येते.


फोटो १

  • जवळून पाहिल्यावर, टीमला आढळले की धनश्री वर्माचे डोळे दोन वेगवेगळ्या रंगांचे आहेत. शिवाय, फोटोंमध्ये एक गुळगुळीत पोत होता, जो एआय-जनरेटेड इमेजेसमध्ये सामान्यतः दिसून येणारे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

  • आम्ही फोटोची सत्यता पडताळण्यासाठी दोन डिटेक्शन टूल्स - साईट इंजिन आणि हाईव्ह मॉडरेशन यांचा वापर केला.
  • दोन्ही टूल्सनी इमेज एआय-जनरेटेड असण्याची बरीच शक्यता दर्शविली.


फोटो २

वरील इमेजमध्ये पाहिल्याप्रमाणे, या फोटोमध्ये स्पष्ट गुळगुळीत पोत दिसला होता. यावरून असे दिसून आले की AI टूल्सच्या मदतीने फोटो तयार केलेला असावा.

  • दोन्ही टूल्सनी इमेज कृत्रिम असण्याची उच्च शक्यता दर्शविली तेव्हा हे अधिक स्पष्ट झाले.
  • पहिल्या टूलने ९९ टक्के निकाल दिला, तर दुसऱ्या टूलने ८८ टक्क्यांहून अधिक शक्यता दर्शविली की फोटो एआय-जनरेटेड असण्याची शक्यता आहे.

निष्कर्ष: हे स्पष्ट आहे की दोन्ही फोटो बनावट असून ते AI टूल्य वापरून तयार केलेले आहेत.

(सदर फॅक्ट चेक the Quint या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

Web Title: fact check shreyas iyer dhanashree verma posing together viral images are ai generated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.