उद्धव ठाकरेंनी मुघल शासक औरंगजेबाला आपला भाऊ म्हटल्याची पोस्ट व्हायरल; जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 02:14 PM2024-11-20T14:14:36+5:302024-11-20T14:27:57+5:30

सोशल मिडिया युजर्सनी उद्धव ठाकरे यांनी मुघल शासक औरंगजेबला आपला भाऊ म्हटल्याची पोस्ट केली आहे.

Fact Check Social media users have posted that Uddhav Thackeray called Mughal ruler Aurangzeb his brother | उद्धव ठाकरेंनी मुघल शासक औरंगजेबाला आपला भाऊ म्हटल्याची पोस्ट व्हायरल; जाणून घ्या सत्य

उद्धव ठाकरेंनी मुघल शासक औरंगजेबाला आपला भाऊ म्हटल्याची पोस्ट व्हायरल; जाणून घ्या सत्य

Claim Review : व्हायरल पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंनी मुघल शासक औरंगजेबला भाऊ म्हटल्याचे सांगितले आहे.
Claimed By : Social Media User
Fact Check : चूक

Created By: the quint
Translated By: ऑनलाइन लोकमत

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणत आहेत? "त्याने आपल्या प्राणाची आहुती दिली. आता मी तो माझा भाऊ आहे असे म्हटल्यास, मला त्याचे नाव माहीत आहे का, असे तुम्ही मला विचाराल? त्याचे नाव औरंगजेब होते. धर्माने तो मुस्लिम होता. पण, त्याने आपल्या प्राणांची आहुती दिली. देशासाठी, त्याने भारत मातेसाठी आपला जीव दिला, तो तुमचा भाऊ नाही का?"

दावा काय?:  हे शेअर करणाऱ्यांनी उद्धव ठाकरे मुघल शासक औरंगजेबाबद्दल बोलत असल्याचा दावा केला आहे.

अर्काईव्ह पोस्टसाठीयेथे आणि येथे क्लिक करा.

हे खरे आहे का?: नाही, हा दावा खोटा आहे.

* उद्धव ठाकरे हे २०१८ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हत्या केलेल्या भारतीय सैनिक औरंगजेब याबद्दल बोलत होते.

आम्हाला काय आढळले: आम्ही व्हिडिओ वेगळ्या स्क्रीनशॉटमध्ये विभागला आणि त्यातील काहींवर गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. यामध्ये ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर १९ फेब्रुवारी २०२३ रोजीचे लाइव्ह स्ट्रीम आढळले.

मुंबईत उत्तर भारतीय समाजासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते.

जो कोणी भारताला आपली मातृभूमी म्हणतो, त्याला आपण आपला भाऊ-बहीण मानतो, असे म्हणत त्यांनी चर्चेला सुरुवात केली.

३२:१२ च्या टाईमस्टॅम्पपासून त्यांनी औरंगजेब विषयी बोलण्याच सुरुवात केली.

उद्धव ठाकरेंनी म्हटलं -

"आमचा एक सैनिक काश्मीरमध्ये होता आणि सुट्टीच्या दिवशी तो आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी घरी जात असताना दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण करून त्याची हत्या केली. काही दिवसांनी त्याच्या शरीराचे अवयव कुठेतरी सापडले. तो आपला होता की नाही? त्याने बलिदान दिले. जर मी म्हणालो की तो माझा भाऊ होता, तर तुम्ही मला त्याचे नाव विचाराल कारण त्याचे नाव औरंगजेब होते. तो मुस्लिम समाजाचा असूनही त्याने आपल्या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, मग तो आपला भाऊ नाही का? तो खरोखरच आमचा भाऊ होता."

मुंबईत उत्तर भारतीय समुदायाशी चर्चा करताना उद्धव ठाकरे

एबीपी माझाने २०२३ मध्ये ठाकरेंच्या भाषणाचे फुटेजही त्यांच्या यूट्यूब पेजवर शेअर केले आहे.

औरंगजेब कोण होता?: रायफलमॅन औरंगजेब चौथ्या जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्रीमध्ये होता आणि त्याचे अपहरण करण्यात आले आणि नंतर १४ जून २०१८ रोजी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी त्याची हत्या केली.

द क्विंटच्या वृत्तानुसार, त्याचा भाऊ पुढच्या वर्षी बदला घेण्यासाठी आणि राज्यातील दहशतवादाशी लढण्यासाठी सैन्यात दाखल झाला.

निष्कर्ष: सोशल मीडिया युजर्संनी ठाकरेंची ही जुनी क्लिप त्यांनी निवडणुकीच्या वेळी मुघल शासकाला आपला भाऊ म्हटल्याचा खोटा दावा करून शेअर केली आहे.
 

Web Title: Fact Check Social media users have posted that Uddhav Thackeray called Mughal ruler Aurangzeb his brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.