Fact Check: टाटा मोटर्सने पुन्हा नॅनो कार लॉन्च करण्याची घोषणा केली? व्हायरल फोटो एडिट केलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 12:22 IST2024-12-12T12:21:31+5:302024-12-12T12:22:23+5:30

Fact Check: टाटा नॅनो ही कार जरी बंद झालेली असली तरी ती पुन्हा नोएल टाटा यांच्या नेतृत्वाखाली लाँच केली जाणार असल्याचे दावे

Fact Check: Tata Motors Announces Nano Car Launch Again? Viral photo edited, not true | Fact Check: टाटा मोटर्सने पुन्हा नॅनो कार लॉन्च करण्याची घोषणा केली? व्हायरल फोटो एडिट केलेले

Fact Check: टाटा मोटर्सने पुन्हा नॅनो कार लॉन्च करण्याची घोषणा केली? व्हायरल फोटो एडिट केलेले

Claim Review : टाटा नॅनो ही कार जरी बंद झालेली असली तरी ती पुन्हा नोएल टाटा यांच्या नेतृत्वाखाली लाँच केली जाणार असल्याचा दावा.
Claimed By : FaceBook User
Fact Check : चूक

Created By: factly
Translated By: ऑनलाईन लोकमत


रतन टाटांचे स्वप्न असलेली टाटा नॅनो ही कार जरी बंद झालेली असली तरी ती पुन्हा नोएल टाटा यांच्या नेतृत्वाखाली लाँच केली जाणार असल्याचे दावे केले जात आहेत. या कारशी संबंधीत फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले जात होते. यामध्ये पेट्रोल इंजिन आणि शहरात चालविण्यासाठी नवे डिझाईन व ३० किमीचे मायलेज देत असल्याचे दावेही केले जात होते.  हे दावे इथे केले जात होते.

या पोस्टमध्ये केलेल्या दाव्यांची पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही गुगल सर्चवरून शोध घेतला परंतु अशी कोणतीही घोषणा आढळली नाही. टाटा मोटर्सने असे विधान केले असते तर त्याची व्यापक चर्चा झाली असती. तथापि, TATA Motors च्या सोशल मीडियावर किंवा कोणत्याही विश्वासार्ह न्यूज प्लॅटफॉर्मवर याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. 

फोटोद्वारे गुगल लेन्सचा वापर करून शोध घेतला असता तिथे आम्हाला यूट्यूब चॅनल ह्यू बोगन मोटर्सवरील एक व्हिडीओ दिसला. हा व्हिडीओ 15 ऑगस्ट 2023 रोजीचा आहे. ही कार टाटाची नॅनो ही नसून तिच्याशी साधर्म्य असलेली टोयोटा आयगो एक्स पल्स ही आहे. 

व्हायरल केलेल्या पोस्टमध्ये टोयोटाचा लोगो बदलण्यात आलेला आहे. तसेच नंबर प्लेटवरील नावही बदलण्यात आले आहे. 

खालील तुलना TATA Motors आणि Toyota Motors च्या कारवरील लोगोमधील फरक दर्शवते. 


तसेच TATA Motors शी ईमेलद्वारे संपर्क साधला असता त्यांनी अशा कोणत्याही कारच्या लाँचिंगबाबत माहिती नाही असे सांगितले. ग्राहकांना योग्य वेळी अधिकृत संपर्क माध्यमांद्वारे नवीन उत्पादनांची माहिती दिली जाईल असे ते म्हणाले. तर टोयोटाच्या वेबसाईटवर ही कार सापडली आहे.

निष्कर्ष : TATA मोटर्सने आधुनिक वैशिष्ट्यांसह नवीन नॅनो कार लॉन्च करण्याची कोणतीही घोषणा केलेली नाही, व्हायरल फोटो हे एडिट करण्यात आलेले आहेत. 

(सदर फॅक्ट चेक Factly या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

Web Title: Fact Check: Tata Motors Announces Nano Car Launch Again? Viral photo edited, not true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.