Fact Check: तो व्हिडीओ उस्ताद झाकीर हुसेन यांचा नाही; जाणून घ्या, ते तबला वादक आहेत कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:16 IST2024-12-17T15:12:29+5:302024-12-17T15:16:39+5:30

जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी १६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी निधन झाले.

Fact Check That video is not of Ustad Zakir Hussain Find out, who is that tabla player? | Fact Check: तो व्हिडीओ उस्ताद झाकीर हुसेन यांचा नाही; जाणून घ्या, ते तबला वादक आहेत कोण?

Fact Check: तो व्हिडीओ उस्ताद झाकीर हुसेन यांचा नाही; जाणून घ्या, ते तबला वादक आहेत कोण?

Claim Review : नुसरत फतेह अलीसोबत तबला वाजवणाऱ्या व्यक्तीला लोकांनी झाकीर हुसेन म्हटले.
Claimed By : Social Media User
Fact Check : दिशाभूल

Created By: PTI News
Translated By: ऑनलाइन लोकमत

जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी १६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी निधन झाले. पण आदल्या दिवशीच रात्री उशीरा सोशल मीडियावर काहींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.  यात काही वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर उस्ताद नुसरत फतेह अली खान यांच्यासोबत तबला वाजवणाऱ्या व्यक्तीला झाकीर हुसेन समजून शेअर केले आहे. 

पीटीआय फॅक्ट चेक डेस्कने याचा तपास केला आणि व्हायरल दावा खोटा असल्याचे सिद्ध केले. व्हिडिओमध्ये तबला वाजवणारी व्यक्ती झाकीर हुसैन नसून पाकिस्तानातील पंजाब घराण्याचे प्रसिद्ध तबलावादक तारी खान आहेत.

दावा- 

१६ डिसेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडीओ शेअर करताना, एका वापरकर्त्याने लिहिले, भूषण, पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसैन जी यांचे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. पोस्टची लिंक, संग्रहण लिंक आणि स्क्रीनशॉट येथे पहा.


हाच व्हिडीओ शेअर करताना आणखी एका युजरने इंग्रजीमध्ये लिहिले की, “झाकीर हुसैन यांच्या निधनाने जग शोक करत आहे, जे एक अप्रतिम कलाकार होते ज्यांची लय आपल्या हृदयात नेहमीच गुंजत राहील.” पोस्ट लिंक, संग्रहण लिंक आणि स्क्रीनशॉट येथे पहा.

इतर वापरकर्ते देखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर करत आहेत. संग्रहण लिंक येथे पहा. या ठिकाणीही पाहा. इथेही पाहता येईल. 

तपास- 

व्हायरल व्हिडिओची 'की-फ्रेम्स' रिव्हर्स शोधल्यावर, आम्हाला तो योगेश जगदेव नावाच्या YouTube चॅनेलवर अपलोड केलेला आढळला. २३ जुलै २०११ रोजी चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या वर्णनात असे म्हटले आहे की व्हिडिओमध्ये उस्ताद तारी खान यांच्यासह उस्ताद नुसरत फतेह अली खान आहेत. व्हिडिओची लिंक आणि स्क्रीनशॉट येथे पहा.

अधिक तपास केल्यावर, आम्हाला ६ ऑगस्ट २०११ रोजी The MrSingh नावाच्या YouTube चॅनेलवर अपलोड केलेला दुसरा व्हिडीओ सापडला. "उस्ताद नुसरत फतेह अली खान आणि उस्ताद तारी खान लाइव्ह व्हिडीओ" या मथळ्यातही हाच दावा करण्यात आला आहे. व्हिडिओची लिंक आणि स्क्रीनशॉट येथे पहा. 

या तपासात डेस्कने व्हायरल व्हिडीओ आणि मूळ व्हिडिओची तुलना केली आणि असे आढळले की, लोक खोट्या दाव्यासह व्हिडीओ शेअर केला आहे. दोन्ही व्हिडीओतील तुलनेचा स्क्रीनशॉट येथे पहा.

आमच्या आतापर्यंतच्या तपासावरून हे स्पष्ट झाले आहे की, लोक प्रसिद्ध तबला वादक तारी खान यांना उस्ताद झाकीर हुसैन समजून व्हिडीओ शेअर करत आहेत.

दावा

नुसरत फतेह अलीसोबत तबला वाजवणाऱ्या व्यक्तीला लोकांनी झाकीर हुसेन म्हटले.

वस्तुस्थिती

व्हिडिओमध्ये तारी खान झाकीर हुसेन नाहीत.

निष्कर्ष

पीटीआयच्या फॅक्ट चेक टीमला असे आढळले आहे की, लोक प्रसिद्ध तबला वादक तारी खान यांना उस्ताद झाकीर हुसेन समजून खोटे दावे करून व्हिडीओ शेअर करत आहेत.

(सदर फॅक्ट चेक PTI News या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

Web Title: Fact Check That video is not of Ustad Zakir Hussain Find out, who is that tabla player?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.