Fact Check: 'तो' आवाज AI वापरून केलेला; PM मोदींनी मुकेश यांचं 'सुपरहिट' गाणं गायल्याचा दावा खोटा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 05:21 PM2024-04-12T17:21:43+5:302024-04-12T17:22:31+5:30
Fact Check: प्रख्यात गायक मुकेश यांनी गायलेले ते गीत पंतप्रधान मोदी यांच्या आवाजात AIच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे.
Created By: विश्वास न्यूज
Translated By: ऑनलाइन लोकमत
Fact Check, Pm Modi AI Generated Song: लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांबद्दल हल्ली विविध पोस्ट व्हायरल होताना दिसतात. त्यातील बहुतांश पोस्ट या निवडणुकीशी संबंधित असतात. पण सोशल मीडियावर सध्या काही यूजर्स पंतप्रधाननरेंद्र मोदींबद्दल एक पोस्ट शेअर करत आहेत. कथित व्हिडिओमध्ये गायक मुकेश यांचे 'किसी की मुस्कुराहटों पे हो निसार' हे गाणे पीएम मोदींच्या आवाजात ऐकू येते. ही पोस्ट शेअर करून असा दावा केला जात आहे की, गायक मुकेशच्या यांचे हे गीत पंतप्रधान मोदींनी आपल्या आवाजातही गायले आहे.
विश्वास न्यूजच्या तपासात पीएम मोदींच्या नावाने व्हायरल झालेले गाणे एआय तयार केले असल्याचे आढळून आले. हे एआय टूलच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. अनेक यूट्यूब चॅनलवर अशी गाणी अपलोड केली जात आहेत असेही निदर्शनास आले.
काय आहे व्हायरल पोस्ट
युजरने विश्वास न्यूजच्या टिपलाइन क्रमांक +91 95992 99372 वर ही पोस्ट पाठवून सत्य सांगण्याची विनंती केली आहे.
फेसबुक युजर सुभाष गुप्ता ( अर्काइव्ह लिंक ) यांनी व्हिडिओ शेअर करून त्यासोबत लिहिले की, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गायक मुकेश यांनी गायलेल्या गाण्याला आपला आवाज दिला. जे साधारणपणे कुणालाही अविश्वसनीय वाटेल पण ते खरे आहे. तुम्ही नक्की ऐका.”
यूट्यूब वापरकर्ता अनुप श्रीवास्तव ( अर्काइव्ह लिंक ) यांनी देखील हे गीत PM मोदी यांच्याच आवाजात गायलेले गाणे असल्याचे म्हटले.
सत्य पडताळणी
व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही हा कीवर्ड Google वर शोधला परंतु व्हायरल दाव्याची पुष्टी करणारी कोणतीही बातमी सापडली नाही.
22 जुलै 2023 रोजी पंतप्रधान मोदींनी गायक मुकेश यांना 100व्या जयंतीनिमित्त मानवंदना वाहिली होती. पंतप्रधानांनी X हँडलवरून पोस्ट के होते की, “मास्टर ऑफ ट्यून्स मुकेश यांचे त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त स्मरण. त्यांची सदाबहार गाणी मनात विविध प्रकारच्या भावना जागवतात. भारतीय संगीतावर त्यांनी छाप सोडली आहे. त्यांचा मधुर आवाज आणि भावपूर्ण संगीत अनेक पिढ्यांना भुरळ घालत राहील.”
Remembering the maestro of melody, Mukesh, on his 100th birth anniversary. His timeless songs evoke a wide range of emotions and have left an indelible mark on Indian music. His golden voice and soul-stirring renditions will continue to enchant generations.
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2023
व्हायरल पोस्टच्या फॉरेन्सिक तपासणीसाठी ऑडिओ स्पूफ डिटेक्शन टूलची मदत घेतली गेली. यासाठी ऑडिओच्या दोन क्लिप तयार करण्यात आल्या, ज्यामध्ये पार्श्वसंगीत असलेली क्लिप ए आणि दुसरी क्लिप बी पार्श्वसंगीता शिवाय तयार करण्यात आली. या दोन्ही क्लिप डिटेक्शन टूलद्वारे तपासण्यात आल्या. यामध्ये, क्लिप A चा स्कोअर -2.3 होता, ज्याने ते AI द्वारे तयार केल्याचे निष्पन्न झाले.
क्लिप बी चा स्कोअर -3.071 आला. हे देखील पुष्टी करते की ते AIने बनवलेले गीत आहे.
यामध्ये एआय ऑडिओ क्लोनिंगचा वापर करण्यात आला आहे.
गुगलवर सर्च केल्यावर आम्हाला यूट्यूबवर काही चॅनल सापडली ज्यावर पीएम मोदींच्या एआय जनरेटेड आवाजात गाणी अपलोड केली गेली आहेत. पीएम मोदींच्या एआय जनरेटेड आवाजातील गायक मुकेश यांचे 'किसी की मुस्कुराहटों पे हो निसार' हे गाणे 25 डिसेंबर 2023 रोजी मोदी म्युझिक प्रोडक्शन चॅनेलवर अपलोड करण्यात आले आहे. त्यात लिहिले आहे की ते AI मेड आहे. त्याच्या शीर्षकात मोदी कव्हर एआय लिहिलेले आहे.
पीएम मोदींच्या एआय निर्मित आवाजातील आणखी काही गाणीही चॅनलवर अपलोड करण्यात आली आहेत.
त्याचप्रमाणे, इतर काही यूट्यूब चॅनेलवर देखील पीएम मोदींची एआय जनरेटेड आवाजात अपलोड केलेली गाणी आहेत. ती ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
Covers.AI आणि TopMedia.AI नावाच्या वेबसाइट्सचा दावा आहे की त्यांनी सेलिब्रिटींच्या AI जनरेटेड आवाजातील गाणी तयार केली आहेत.
साऊथ वन नावाच्या वेबसाईटवर सहा महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेल्या लेखात एआय ॲप्सच्या मदतीने पीएम मोदींचा आवाज गाण्यांमध्ये वापरला जात असल्याचे लिहिले आहे. केवळ हिंदीच नाही तर पंतप्रधान मोदींचा एआय निर्मित आवाज तमिळ, तेलगू, मल्याळम भाषांमध्येही वापरला जात आहे.
याबाबत आम्ही मोदी म्युझिक प्रॉडक्शनच्या अँडमिनशी संपर्क साधून व्हायरल झालेला व्हिडिओ पाठवला. ते म्हणाले- "हा व्हिडिओ AI जनरेट आहे."
एआय जनरेट केलेली पोस्ट खरी असल्याचे लक्षात घेऊन आम्ही त्या युजरचे प्रोफाइल स्कॅन केले. मुंबईत राहणाऱ्या या युजरचे जवळपास 5 हजार फ्रेंड्स आहेत.
मोदींप्रमाणेच सचिन तेंडुलकरसह इतर काही सेलिब्रिटींच्या आवाजाचे क्लोनिंग करून डीपफेक व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.
निष्कर्ष-
पोस्टच्या पडताळणीनंतर आम्ही अशा निष्कर्षावर पोहोचलो की व्हायरल पोस्टमधील दावा खोटा आहे. पंतप्रधान मोदी यांचे 'किसी के मुस्कुराहटों पे हो नीसार' हे गीत एआय निर्मित आहे.
(सदर फॅक्ट चेक 'विश्वास न्यूज' या वेबसाइटने प्रसिद्ध केले आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)