Fact Check: महाकुंभातील व्हायरल गर्ल मोनालिसाच्या मृत्यूचा व्हिडीओ Fake; पाहण्यात आला तर विश्वास ठेवू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:22 IST2025-02-07T16:19:44+5:302025-02-07T16:22:53+5:30

प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. या महाकुंभमध्ये अनेकजण सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात हार विकण्यासाठी इंदूरहून आलेली मोनालिसा व्हायरल झाली.

Fact Check video of the death of viral girl Monalisa in Mahakumbh is fake; if you watch it, don't believe it | Fact Check: महाकुंभातील व्हायरल गर्ल मोनालिसाच्या मृत्यूचा व्हिडीओ Fake; पाहण्यात आला तर विश्वास ठेवू नका!

Fact Check: महाकुंभातील व्हायरल गर्ल मोनालिसाच्या मृत्यूचा व्हिडीओ Fake; पाहण्यात आला तर विश्वास ठेवू नका!

Claim Review : महाकुंभमध्ये व्हायरल झालेल्या मोनालिसाचा मृत्यू झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Claimed By : Social Media User
Fact Check : चूक

Created By: आज तक

Translated By: ऑनलाइन लोकमत

प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरु आहे. या महाकुंभमध्ये अनेकजण सोशल मीडियावर व्हायरल झाले. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर महाकुंभमध्ये हार विकणारी मोनालिसा चांगलीच व्हायरल झाली आहे.पण, काही लोकांनी सोशल मीडियावरील तिच्या लोकप्रियतेचा फायदा घ्यायला सुरुवात केली आहे. व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्यासाठी, लोक तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. आता काहींनी मोनालिसाचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.

काहींनी सोशल मीडियावर मोनालिसाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे लिहिले आहे. तर काही जण तर तिला गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याचाही दावा करत आहेत.

फेसबुक पासून ते इन्स्टाग्रामपर्यंत शेकडो लोकांनी अशा पोस्ट शेअर केल्या आहेत. व्हायरल झालेल्या पोस्टच्या आर्काइव्ह व्हर्जन येथे पाहा. 

पण 'आज तका'ला मोनालिसाचे मामा विनोद चौहान यांनी सांगितले की, मोनालिसा पूर्णपणे सुरक्षित आहे. तिच्या मृत्यूची बातमी पूर्णपणे मूर्खपणाची आहे.

मोनालिसा बातम्यांमध्ये आल्यापासून, विनोद हेच तिचे मीडियाशी संबंधित काम पाहत आहेत. मोनालिसा ही इंदूरजवळील महेश्वरची रहिवासी आहे. विनोद हा मोनालिसाच्या वॉर्डचा भाजप कार्यकर्ता आहे आणि तो मोनालिसाच्या आईला आपली बहीण मानतो.
 
विनोद याने आम्हाला मोनालिसाचे इंस्टाग्राम प्रोफाइल देखील पाठवले. मोनालिसा या प्रोफाइलवर सतत तिचे व्हिडीओ पोस्ट करत असते. यावरून असे सिद्ध होते की तिला काहीही झालेले नाही.

याशिवाय, मोनालिसाचा एक बनावट व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती ग्लॅमरस शैलीत नाचताना दिसत आहे. पण हा व्हिडीओ एडिट केलेला आहे. फेस स्वॅप तंत्रज्ञानाच्या मदतीने, मोनालिसाचा चेहरा एका इंस्टाग्राम इन्फ्लुएंसरच्या व्हिडिओमध्ये जोडण्यात आला आहे. आज तक फॅक्ट चेकनेही यावर वृत्त दिले आहे.

(सदर फॅक्ट चेक aaj tak या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

Web Title: Fact Check video of the death of viral girl Monalisa in Mahakumbh is fake; if you watch it, don't believe it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.