लोकसभेतील पराभवानंतर नवनीत राणांना अश्रू अनावर? जाणून घ्या, व्हायरल व्हिडिओचे सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 02:21 PM2024-06-06T14:21:33+5:302024-06-06T14:23:30+5:30
Fact Check: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Created By: newschecker
Translated By: ऑनलाइन लोकमत
Fact Check: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. महायुतीने ४५ हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात २० जागाही जिंकता आल्या नाहीत. भाजपाचे काही अपवाद सोडल्यास दिग्गज उमेदवार पडले. भाजपाला केवळ ९ जागा जिंकता आल्या. यातच अमरावतीत भाजपा उमेदवार नवनीत राणा यांनाही पराभव पत्करावा लागला. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर pic.twitter.com/hAuTiWmVo1
— Nehr_who? (@Nher_who) June 4, 2024 " target="_blank">नवनीत राणा रडतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (संग्रहित लिंक) असाच आणखी एक दावा pic.twitter.com/fn2Y8ICRov— Dr Monika Singh (@Dr_MonikaSingh_) June 4, 2024 " target="_blank">इथे पाहता येईल. या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी व्हायरल क्लिपमधून कीफ्रेमच्या रिव्हर्स इमेज शोधामुळे ५ मे २०२२ रोजी इंडिया टुडेच्या अधिकृत YouTube चॅनेलवर " target="_blank">पोस्ट केलेल्या त्याच व्हिडिओकडे नेले.वृत्तानुसार, अमरावतीच्या तत्कालीन खासदार नवनीत राणा या आपले पती आमदार रवी राणा यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात पाहून बांध आवरू शकल्या नाहीत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची धमकी दिल्याबद्दल या जोडप्यास अटक करण्यात आली होती आणि १२ दिवस तुरुंगात घालवल्यानंतर त्यांचे भावनिक पुनर्मिलन होताना दिसले.
निष्कर्ष
" target="_blank">CNN-News18, ABP Live आणि " target="_blank">Zee 24 Taas सारख्या इतर वृत्तवाहिन्यांनी देखील हाच व्हिडिओ आणि तत्सम माहिती प्रकाशित केली आहे. त्यामुळे भाजपच्या नवनीत राणा यांचा भावनिक व्हिडिओ अलीकडचा नसून २०२२ चा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
(सदर फॅक्ट चेक newschecker या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)