Fact Check : १९६३ मध्ये '‘The Omicron Variant' नावाचा सिनेमा आला होता?, वाचा काय आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 03:00 PM2021-12-03T15:00:08+5:302021-12-03T15:00:08+5:30

Omicron Variant Movie Poster fact check : कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट समोर आल्याने संपूर्ण जग चिंतेत आहे. सध्या एका चित्रपटाचा एक पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

fact check was there a 1963 movie called the omicron variant no this poster was created for fun | Fact Check : १९६३ मध्ये '‘The Omicron Variant' नावाचा सिनेमा आला होता?, वाचा काय आहे सत्य

Fact Check : १९६३ मध्ये '‘The Omicron Variant' नावाचा सिनेमा आला होता?, वाचा काय आहे सत्य

googlenewsNext

Omicron Variant Movie Poster fact check : कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरिएंट समोर आल्याने संपूर्ण जग चिंतेत आहे. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेमधील नऊ प्रांतांपैकी पाच प्रांतांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट सापडला आहे. एकीकडे ओमायक्रॉन विषाणूची भीती आहे, तर दुसरीकडे यावरील एक चित्रपटही १९६३ मध्ये प्रदर्शिक झाल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, याचा एक पोस्टरही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो सध्या सर्वाच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

सध्या 'द ओमायक्रॉन व्हेरिअंट' नावाच्या चित्रपटाचा एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या दिवशी पृथ्वीला स्मशानस्वरूपात बदललं होतं, असंही टॅगलाइन यात देण्यात आली आहे. हा चित्रपट १९६३ मध्ये प्रदर्शित झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, हा पोस्टर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी या महासाथीची दीर्घकाळापासून योजना आखली जात होती असंही म्हटलं होतं. याशिवाय बॉलिवूडमधील चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीदेखील या चित्रपटाचा व्हायरल पोस्टर शेअर केला होता.

 
दरम्यान, हा पोस्टर एडिट करून तयार करण्यात आलेला असून मूळ पोस्टर हा १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फेज IV' या चित्रपटाचा आहे. बेकी चीटल या आयरिश दिग्दर्शक आणि लेखकानं केवळ मनोरंजनासाठी हे व्हायरल पोस्टर तयार केलं होतं. तसंच 'द ओमायक्रॉन व्हेरिअंट' अशा नावाचा कोणताही चित्रपट नाही. १ डिसेंबर २०२१ रोजी बेकी चीटलनं हे पोस्टर आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलं होतं. तसंच फोटोशॉपचा वापर करून हे तयार केल्याचंही सांगितलं होतं. दरम्यान, हे गांभीर्यानं घेऊ नये अशी विनंतीही त्यांनी केली.

Web Title: fact check was there a 1963 movie called the omicron variant no this poster was created for fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.