Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 12:04 PM2024-04-29T12:04:30+5:302024-04-29T12:19:39+5:30

Fact Check : एका व्हिडिओमध्ये काही लोक भाजपाचे झेंडे जाळताना दिसत आहेत. पंजाबमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून भाजपाचे झेंडे जाळले असा दावा याबाबत करण्यात येत आहे. त्याबाबत जाणून घेऊया...

False claims viral as people in punjab burnt bjp party flags during lok sabha elections 2024 | Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'

Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'

Claim Review : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात रस्त्यावर उतरून लोकांनी झेंडे जाळले?
Claimed By : facebook User
Fact Check : चूक

Created By: marathi.factcrescendo
Translated By: ऑनलाइन लोकमत

लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच आता जुने व्हिडीओ हे चुकीच्या दाव्यासह शेअर करण्यात येत आहेत. एका व्हिडिओमध्ये काही लोक भाजपाचे झेंडे जाळताना दिसत आहेत. पंजाबमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून भाजपाचे झेंडे जाळले असा दावा याबाबत करण्यात येत आहे. 

आमच्या WhatsApp फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडीओ पाठवून याबद्दल सत्य माहितीची विचारणा केली.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ 3 वर्षांपूर्वी हरियाणातील एलेनाबाद शहरात झालेल्या घटनेचा असल्याचं पडताळणीअंती समजलं आहे. 

काय आहे दावा ? 

"पंजाबमध्ये भाजपा विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. गाडया तपासल्या जात आहेत. एका गाडीत भाजपाचे झेंडे मिळालेत. हे झेंडे जमा करून जाळले गेले. देशात नवीन स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली आहे. याची सुरुवात पंजाबमधून झाली आहे" असं युजर्सनी भाजपाचे झेंडे जाळतानाचा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर हा व्हायरल व्हिडीओ 2021 पासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचं समजलं आहे. 

"एलनाबाद विधानसभा पोटनिवडणुकीत शेतकऱ्यांनी भाजपाचे झेंडे जाळले" असं बेबाक आवाज नावाच्या फेसबुक पेजवर हाच व्हिडीओ शेअर करताना म्हटलं होतं.

अर्काइव्ह

काँग्रेसचे हरियाणा प्रदेश सरचिटणीस विकास बन्सल यांनी देखील आपल्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विट केला होता. 

https://twitter.com/INCBANSAL/status/1446545857730400256

अर्काइव्ह

याबाबत आम्ही अधिक सर्च केल्यावर 2021 मध्ये शेतकरी आंदोलन सुरू असताना हरियाणामध्ये भाजपा नेते गोविंद कांडा एलनाबाद विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं असं समजलं.

ई-समाचार या फेसबुक पेजवर या घटनेचा व्हिडीओ उपलब्ध आहे. 

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ इंडियन नॅशनल लोक दलाचे नेते अभय चौटाला यांनी आमदारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर एलनाबाद जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीसाठी नामांकन भरण्यासाठी जात असताना भाजपा उमेदवार गोविंद कांडा आणि तथाकथित संयुक्त किसान मोर्चाचे उमेदवार विकास पाचर यांना विरोधाचा सामना करावा लागला होता. अधिक महिती येथे वाचू शकता.

निष्कर्ष

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित नाही हे यावरून सिद्ध होतं. 2021 मध्ये हरियाणातील एलनाबादमध्ये हा विरोध झाला होता. भ्रामक दाव्यासह व्हिडीओ व्हायरल होत आहे.

(सदर फॅक्ट चेक marathi.factcrescendo.com या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)
 

Web Title: False claims viral as people in punjab burnt bjp party flags during lok sabha elections 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.