खराेखरच जाहीर झाली का लाेकसभा निवडणुकीची तारीख?; जाणून घ्या, 'त्या' पत्राचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 09:12 AM2024-02-12T09:12:57+5:302024-02-12T09:13:31+5:30

निवडणूक आयाेगाने अद्याप लाेकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्याच नाही

Has the Lok Sabha election date really been announced?; Know the truth of 'that' letter | खराेखरच जाहीर झाली का लाेकसभा निवडणुकीची तारीख?; जाणून घ्या, 'त्या' पत्राचं सत्य

खराेखरच जाहीर झाली का लाेकसभा निवडणुकीची तारीख?; जाणून घ्या, 'त्या' पत्राचं सत्य

देशात यावर्षी लाेकसभेची निवडणूक हाेणार आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयाेगही कामाला लागले आहे. निवडणूक कधी हाेणार, यासंदर्भात निवडणूक आयाेगाच्या नावाचे एक पत्र साेशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

१६ फेब्रुवारीला आचारसंहिता लागणार असून मार्च महिन्यात मतदान हाेणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, हा दावा खाेटा आहे. या पत्राची सत्यता तपासून पाहिली असता असे काेणतेही पत्र निवडणूक आयाेगाने जारी केलेले नसल्याचे आढळले. तसेच निवडणूक आयाेगाने अद्याप लाेकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केलेल्याच नाहीत. निवडणूक आयाेगानेही हे पत्र बनावट असल्याचे म्हटले आहे.

 

Web Title: Has the Lok Sabha election date really been announced?; Know the truth of 'that' letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.