Fact Check: अहो, ते माझं वाक्य नाही! मी तसं कधी म्हटलंच नाही!! रतन टाटांचे उद्गार ऐकून अवाक् व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 12:48 PM2022-02-05T12:48:58+5:302022-02-05T12:52:59+5:30

रतन टाटांनी सांगितलं 'त्या' वाक्यामागचं सत्य; मुलाखतकार महिला अवाक्

I never said that Ratan Tata on a viral quote | Fact Check: अहो, ते माझं वाक्य नाही! मी तसं कधी म्हटलंच नाही!! रतन टाटांचे उद्गार ऐकून अवाक् व्हाल

Fact Check: अहो, ते माझं वाक्य नाही! मी तसं कधी म्हटलंच नाही!! रतन टाटांचे उद्गार ऐकून अवाक् व्हाल

googlenewsNext

टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा. स्पर्धेच्या युगात मुल्यांशी कोणतीही तडजोड न करता व्यवसाय करणारे रतन टाटा कोट्यवधी भारतीयांसाठी आदरणीय व्यक्तीमत्त्व. टाटा समूहाला दिशा देणारे, देशाचा विचार आधी करणारे रतन टाटा अनेकांसाठी प्रेरणास्थान. टाटांची अनेक वाक्यं इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात. पण यातलंच एक वाक्य माझं नाही, मी असं कधी म्हटलेलंच नाही, असं खुद्द रतन टाटांनी सांगितलं तर? एका मुलाखतीत असा किस्सा घडला आहे.

योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही. मी निर्णय घेतो आणि ते योग्य ठरवतो. रतन टाटांचं हे वाक्य तुम्ही अनेक ठिकाणी वाचलं असेल. गुगलवर जाऊन रतन टाटा कोट्स असं सर्च केल्यावर मिळणाऱ्या रिझल्टमध्ये हे वाक्य अगदी सहज सापडतं. पण हे वाक्य रतन टाटांचं नाहीए. दस्तुरखुद्द रतन टाटांनी एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली.

मुलाखतीतला संवाद काय?
योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही. मी निर्णय घेतो आणि ते योग्य ठरवतो, असं तुम्ही म्हणाला होतात. त्याबद्दल काय सांगाल, असा सवाल मुलाखत घेणाऱ्या महिलेनं रतन टाटांना विचारला. त्यावर माझ्या उत्तरानं कदाचित तुम्ही नाराज व्हाल, असं टाटा म्हणाले. 'मी तसं कधीच म्हटलेलं नाही. ते वाक्य माझं नाही. फेसबुक, ट्विटरवर माझ्या नावानं ते वाक्य व्हायरल झालं. तुम्ही सोशल मीडियावर काय कारवाई करणार?,' असं टाटा म्हणाले.

'ती' पोस्टदेखील रतन टाटांची नाही बरं!
२०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लावण्यात आला. त्यावेळी अर्थव्यवस्थाच मोडून पडणार, अशी भीती काही जण बोलून दाखवत होते. त्यावेळी रतन टाटांच्या नावानं एक प्रेरणादायी पोस्ट फिरत होती. मात्र ती पोस्ट आपली नसल्याचं रतन टाटांनी ट्विट करून सांगितलं होतं. माझ्या नावानं व्हायरल होणाऱ्या पोस्ट पडताळून पाहा, असं आवाहन टाटांनी केलं होतं. मला काही म्हणायचं असल्यास त्यासाठी मी माझ्याकडे असलेल्या अधिकृत चॅनल्सचा वापर करेन, असंही टाटांनी सांगितलं होतं.

Web Title: I never said that Ratan Tata on a viral quote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.