Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 03:47 PM2024-05-29T15:47:44+5:302024-05-29T16:06:27+5:30

Fact Check : अभिनेत्री कंगना राणौत अंडरवर्ल्ड डॉन आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेमसोबत असल्याचा दावा करत एक फोटो शेअर केला जात आहे. पण तो फोटो दिशाभूल करणारा आहे.

Kangana Ranaut refutes claim that she with gangster Abu Salem; reveals who's in picture with her | Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'

Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'

Claim Review : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम.
Claimed By : Twitter User
Fact Check : चूक

Created By: Logically Facts
Translated By: ऑनलाइन लोकमत

हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवणारी अभिनेत्री कंगना राणौत हिचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, ज्यामध्ये ती एका बारमध्ये एका व्यक्तीसोबत दिसत आहे. तिच्यासोबत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम असल्याचा दावा करत हा फोटो शेअर केला जात आहे. "भक्तों की शेरनी के देश के दुश्मन अबू सलेम के साथ कुछ यादगार पल" असं या फोटोवर लिहिलं आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये १ जून रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी हे फोटो शेअर केला जात आहे. मंडीमध्ये कंगना काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे.

एक्सवर हा फोटो शेअर करत एका युजरने "अंधभक्तों की दीदी, अबु सलेम के साथ, कुछ यादगार पल बिताती हुई" असं कॅप्शन दिलं आहे. ही पोस्ट आतापर्यंत 33,000 पेक्षा जास्त वेळा पाहिली गेली आहे. पोस्टचं अर्काइव्ह व्हर्जन येथे पाहा. या दाव्यासह शेअर केलेल्या इतर पोस्ट येथे, येथे आणि येथे पाहता येऊ शकतात.

व्हायरल पोस्टचा स्क्रीनशॉट. (सोर्स: एक्स/स्क्रीनशॉट)

मात्र, व्हायरल झालेल्या फोटोमध्ये कंगनासोबतची व्यक्ती अबू सालेम नसून एंटरटेनमेंट जर्नलिस्ट मार्क मॅन्युअल आहेत. हा फोटो 2017 मधला आहे जेव्हा मार्क मॅन्युअलने कंगना राणौतची मुलाखत घेतली होती. नंतर तोच फोटो त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला.

सत्य कसं शोधलं?

आम्ही Google वर रिव्हर्स इमेज सर्च केली तेव्हा आम्हाला 2017 मधील फेसबुक पोस्ट आढळली (अर्काइव्ह येथे) ज्यामध्ये हा फोटो आहे. आम्हाला आढळलं की यात अभिनेत्री कंगना रणौतसह एंटरटेनमेंट जर्नलिस्ट मार्क मॅन्युअल आहेत.

15 सप्टेंबर 2017 रोजी शेअर केलेल्या फोटोसोबत लिहिलेल्या एक भल्या मोठ्या पोस्टमध्ये मार्क मॅन्युअल यांनी लिहिलं की, हा फोटो खार (मुंबई) येथील कॉर्नर हाऊसमध्ये कंगनाच्या 'सिमरन' चित्रपटाचे सेलिब्रेट करण्यासाठी शॅम्पेन ब्रंच दरम्यान काढण्यात आला होता.

त्याच दिवशी मार्क मॅन्युअल यांनीही हा फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला (अर्काइव्ह येथे). मार्क मॅन्युअल हे टाइम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक आहेत. त्यांनी मिड-डे मध्ये पत्रकार म्हणून काम केलं आहे आणि हिंदुस्तान टाइम्स आणि हफिंग्टन पोस्टसारख्या माध्यम संस्थांमध्ये कॉलमनिस्ट म्हणून काम केलं आहे.

आमच्या तपासणीत, आम्हाला मार्क मॅन्युअल यांची 3 ऑक्टोबर 2023 ची पोस्ट सापडली (अर्काइव्ह येथे), ज्यामध्ये त्यांनी स्वतःच्या आणि कंगनाच्या फोटोसह काही हेडलाईन्सचे स्क्रीनशॉट शेअर केले आणि लिहिलं की काही काँग्रेसच्या लोकांनी 2017 मध्ये हफिंग्टन पोस्टसाठी लिहिलेलं त्यांच्या आर्टिकलमध्ये त्यांचा आणि कंगनाचा फोटो हे समजून शेअर करत आहेत की, भाजपाकडे झुकलेली अभिनेत्री दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसोबत दारू पिताना दिसली.

हाच फोटो सोशल मीडियावर सतत शेअर केला जात आहे. 1 ऑक्टोबर, 2023 रोजी, कंगनाने एक्सवर (अर्काइव्ह येथे) एका युजरने शेअर केलेल्या फोटोला उत्तर दिलं होतं. मी हे मानत नाही की काँग्रेसचे लोक वास्तवाबाबत काही विचार करत असतील की तो गँगस्टर अबू सालेम आहे जो मुंबईतील एका बारमध्ये माझ्यासोबत असाच फिरत असेल. ते टाइम्स ऑफ इंडियाचे माजी एंटरटेनमेंट ए़डिटर आहेत, ज्यांचं नाव मार्क मॅन्युअल आहे. 

आम्ही गँगस्टर अबू सालेम आणि पत्रकार मार्क मॅन्युअल यांच्या फोटोंमध्ये तुलना केली, जे स्पष्टपणे दर्शवते की ते भिन्न लोक आहेत.

अबू सालेम आणि मार्क मॅन्युअल यांच्या फोटोंमधील तुलना. (एक्स, इन्स्टाग्राम, इंडियन एक्सप्रेस/स्क्रीनशॉट)

कंगना राणौतने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट करून व्हायरल दाव्याचे खंडन केलं होतं. तथापि, ही स्टोरी आता उपलब्ध नाही. पण त्याचा स्क्रीनशॉट अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये पाहायला मिळतो.

निर्णय

कंगना राणौतचा 2017 चा एंटरटेनमेंट जर्नलिस्ट मार्क मॅन्युअल यांच्यासोबतचा फोटो शेअर करण्यात आला असून फोटोत तिच्यासोबत गँगस्टर अबू सालेम उपस्थित असल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे.

(सदर फॅक्ट चेक Logically Facts या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)
 

Web Title: Kangana Ranaut refutes claim that she with gangster Abu Salem; reveals who's in picture with her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.