Fact Check : नोकरी करणाऱ्यांना मिळणार तब्बल 1,55,000 रुपये?; जाणून घ्या, 'त्या' मेसेजमागचं नेमकं 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 09:49 AM2022-06-07T09:49:01+5:302022-06-07T10:04:14+5:30
Fact Check : कामगार मंत्रालय (Ministry of Labour and Employment) नोकरी करणाऱ्यांना 1,55,000 रुपयांचा लाभ देत आहे असा मेसेज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली - नोकरी करणाऱ्यांसाठी आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कामगार मंत्रालय (Ministry of Labour and Employment) नोकरी करणाऱ्यांना 1,55,000 रुपयांचा लाभ देत आहे असा मेसेज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याबाबतच्या अनेक पोस्टही व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये कामगार मंत्रालय नोकरी करणाऱ्यांना लाखो रुपयांचा लाभ देत असल्याचा दावा केला जात आहे. पण आता प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) याबाबतची माहिती दिली आहे.
PIB Fact Check ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करून लोकांना याबाबत सावधानता बाळगण्याचा इशारा दिला आहे. सरकारने अशी योजना आणली नसून अशा प्रकारची चुकीची माहिती देणारा मेसेज पूर्णपणे खोटा आणि बनावट आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या असं आवाहन करण्यात आलं आहे. पीआयबीने व्हायरल पोस्ट पाहिल्यानंतर त्याची सत्यता तपासली, ज्याद्वारे या पोस्टचे सत्य समोर आले आहे. एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यात दावा करण्यात आला आहे की 1990-2021 दरम्यान काम करणाऱ्या कामगारांना कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून 1,55,000 रुपयांचा लाभ दिला जात आहे.
A message is viral on social media which is claiming to offer a benefit of Rs. 1,55,000 in the name of the Ministry of Labour and Employment to the workers who worked between 1990-2021#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 6, 2022
▶️This message is FAKE
▶️No such benefit is announced by @LabourMinistrypic.twitter.com/w9B9elnOqm
पीआयबीने सांगितलं आहे की, हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. असा कोणताही मेसेज मंत्रालयाने जारी केलेला नाही. असे खोटे व्हिडीओ कोणीही शेअर करू नका. तथ्य तपासणीनंतर पीआयबीने हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा मेसेजपासून प्रत्येकाने सावध राहावे, असे पीआयबीने म्हटले आहे. PIB ने लोकांना असे मेसेज फॉरवर्ड न करण्यास सांगितलं आहे. अशा मेसेजद्वारे दिशाभूल करून, तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती आणि पैसा धोक्यात आणू शकता.
खोट्या बातम्या पसरण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न
PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.