Fact Check: रिकाम्या खुर्च्या असलेला 'तो' फोटो 'ब्रह्मास्त्र'च्या 'शो'चा नव्हे, तर अर्जेंटिनातील थिएटरचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 11:45 AM2022-09-12T11:45:05+5:302022-09-12T11:55:19+5:30

'ब्रह्मास्त्र'च्या रिलीजच्या पहिल्या दिवशी स्क्रीनिंगवेळी थिएटर पूर्ण रिकामी असल्याचा दावा करणारा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

over decade old image of empty theatre from argentina goes viral claiming brahmastra s box office failure | Fact Check: रिकाम्या खुर्च्या असलेला 'तो' फोटो 'ब्रह्मास्त्र'च्या 'शो'चा नव्हे, तर अर्जेंटिनातील थिएटरचा!

Fact Check: रिकाम्या खुर्च्या असलेला 'तो' फोटो 'ब्रह्मास्त्र'च्या 'शो'चा नव्हे, तर अर्जेंटिनातील थिएटरचा!

Next

अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धडाक्यात सुरुवात केली आहे. तसंच चित्रपटाला समीक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असताना सोशल मीडियावर मात्र चित्रपटावर बहिष्काराचा ट्रेंड फॉलो केला जात आहे. याच ट्रेंडमध्ये सध्या एका रिकाम्या थिएटरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या लोकांनी हा फोटो शेअर केला आहे त्यांच्या दाव्यानुसार 'ब्रह्मास्त्र'च्या रिलीजच्या पहिल्या दिवशी स्क्रीनिंगवेळी थिएटर पूर्ण रिकामी असल्याचं सांगण्यात येत आहे. या फोटोमध्ये एक व्यक्ती रिकाम्या खुर्च्यांमध्ये मध्यभागी बसलेला दिसतो, तर इतर दोघे कोपऱ्यात गप्पा मारताना दिसतात. या फोटोमागचं नेमकं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधित फोटो 'ब्रह्मास्त्र'च्या शोचा नसल्याचं निष्पन्न झालं आहे.

दावा काय?
फेसबुकवर ब्रह्माजीत नागर नावाच्या अकाऊंटवर एका थिएटरमधील रिकाम्या खुर्च्यांचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यात एक रिकाम्या खुर्च्यांच्या मधोमध बसलेला दिसतो. तर मागच्या बाजूला काही व्यक्ती गप्पा मारताना दिसतात. हा फोटो 'ब्रह्मास्त्र'च्या पहिल्या शोचा असल्याचा दावा यूझरनं कॅप्शनमध्ये केला आहे. ''एक भारतरत्न तर यांनाही द्यायला हवा. एकटाच ब्रह्मास्त्र सिनेमा पाहायला गेला आणि अजिबात घाबरला नाही. ब्रह्मास्त्र सिनेमाचा पहिलाच शो सुपर फ्लॉप ठरला. करीना खान, तापसी पन्नू यांच्यानंतर आलिया भट्ट आणि करण जोहरचीही इच्छा पूर्ण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आमचे सिनेमा पाहू नका असं त्यांनी आवाहन केलं होतं त्यामुळे सिनेमावर पूर्णपणे बहिष्कार टाका. थिएटरमध्ये एकही दर्शक नाही", अशा कॅप्शनसह संबंधित फोटो व्हायरल करण्यात आला आहे. तसंच कॅप्शनमध्ये #BoycottBrahmastra आणि #BoycottBollywoodMovies हे हॅशटॅगही वापरण्यात आले आहेत.  व्हायरल पोस्ट येथे क्लिक करुन पाहू शकता.

कशी केली पडताळणी?
गुगल रिव्हर्स इमेज सर्जच्या सहाय्याने संबंधित दाव्यातील फोटो सर्च केला असता "The Print" नं १० जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध केलेली बातमी दिसून येते. यातून संबंधित फोटो जुना असल्याचं सिद्ध होतं. तसंच बातमीतील माहितीनुसार रिकाम्या थिएटरचा हा फोटो ब्रह्मास्त्र सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळीचाही नसल्याचं स्पष्ट होतं. महत्वाचं म्हणजे ज्या बातमीसाठी हा फोटो वापरण्यात आला आहे तो प्रातिनिधीक फोटो असल्याचं फोटोच्या कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे हा फोटो नेमका केव्हा आणि कुठे क्लिक केला गेला आहे याची पडताळणी आम्ही केली. 

फोटोबाबत गुगलवर आणखी सर्च केल्यावर फ्लिकर साइटवर तो आढळून आला. ऑनलाइन फोटोग्राफ्स शेअर करण्यासाठी या वेबसाइटचा वापर केला जातो. यात संबंधित फोटो फोटोग्राफर Beatrice Murch यांनी क्लिक केला असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसंच हा फोटो २५ ऑगस्ट २००९ रोजी क्लिक करण्यात आला आहे. फोटो नेमका कोणत्या थिएटरमधला आहे याची माहिती देण्यात आलेली नसली तरी त्यात Argentina, Buenos Aires and Teatro Alvear हे टॅग्ज फोटोसाठी वापरण्यात आले आहेत. 

वरील किवर्ड्स वापरुन गुगल सर्चमध्ये आणखी सर्च केल्यावर 'Teatro Presidente Alvear' in Buenos Aires, the capital of Argentina नावाचं थिएटर सापडलं. कीवर्डसह आणखी सर्च केल्यावर थिएटरबाबत लिहिलेला एका स्पॅनिश लेखात हाच फोटो आढळून आला. ज्यात आम्हाला थिएटरच्या आतील फोटो सापडले. थिएटरच्या भिंतीवरील लाइट्सची डिझाइन आणि आसन व्यवस्था यांची तुलना केली तेव्हा हे स्पष्ट झालं की व्हायरल प्रतिमा याच थिएटरची आहे. 

दुसऱ्याबाजूला ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या बॉक्स ऑफीस कलेक्शनचा आकडा पाहिला तर पहिल्या दोनच दिवसात चित्रपटानं १६० कोटींच्या कमाईचा आकडा गाढला असल्याचं सांगण्यात आलं आहे. देशव्यापी कलेक्शन निर्मात्यांसाठीही समाधानकारक दिसून आलं आहे. कारण चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं वीकेंडच्या पहिल्या दोन दिवसात भारतात जवळपास ७१ कोटी रुपयांची कमाई केली होती. 

निष्कर्ष: रिकाम्या थिएटरचा फोटो 'ब्रह्मास्त्र'च्या स्क्रिनिंगचा नसून तो अर्जेंटिनातील एका थिएटरचा आहे. 

Web Title: over decade old image of empty theatre from argentina goes viral claiming brahmastra s box office failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.