पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मुलीनं केलंय भारतात लग्न? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 03:48 PM2022-04-12T15:48:56+5:302022-04-12T15:50:16+5:30

शाजिया सिद्दीक आणि मिया मोहम्मद सिद्दीक यांची मुलगी सामियाच्या लग्नाचे फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहेत.

Pakistani Prime Minister Shahbaz Sharif's daughter got married in India? Know the truth | पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मुलीनं केलंय भारतात लग्न? जाणून घ्या सत्य

पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मुलीनं केलंय भारतात लग्न? जाणून घ्या सत्य

googlenewsNext

नवी दिल्ली – यश चोपडाचा सिनेमा वीर जारा कदाचित तुम्ही पाहिला असेल. भारतातील वीर प्रताप सिंह एअरफोर्सचे अधिकारी होते आणि जारा हयात खान पाकिस्तानी मुलगी असल्याचं दाखवले आहे. जारा तिच्या आईच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी भारतात आली होती आणि तिला वीरवर प्रेम जडते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात भलेही ३ युद्ध झाले असतील तरी दोन्ही देशांमधील लोकांमध्ये लग्न, प्रेम याचं स्वागत केले गेले आहे. अनेक भारतीय सेलेब्रिटीने पाकिस्तानींसोबत लग्न केले आहे.

आता शाहबाज शरीफ(Shehbaz Sharif) हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनले आहेत. त्यामुळे शरीफ आणि भारत यांच्यातील जुने संबंध याबाबत चर्चा सुरू आहे. गुगलवर सप्टेंबर २०१३ मध्ये झालेल्या एका लग्नाबाबत माहिती समोर आली आहे. पाकच्या पंजाबमधील तत्कालीन मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांच्या मुलीचं भारतातील पंचकूलामधील भारतीय सैन्य कमांडरच्या नातवाशी लग्न केले आहे. आता शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान बनले आहेत. त्यामुळे या बातमीत कितपत तथ्य आहे याबाबत जाणून घेऊया.

९ वर्षापूर्वी पंचकूलात झाले लग्न

पंचकूलामध्ये सप्टेंबर २०१३ मध्ये भारताच्या एका लष्करी अधिकाऱ्याच्या घरात लग्न झाले. त्यात नवरी मुलगी पाकिस्तानमधील होती. पण ही गोष्ट खरी आहे की त्यातील मुलगी शाहबाज शरीफ यांची मुलगी नव्हती. त्यादिवशी सियाचिनमधील हिरो ले. जनरल प्रेमनाथ हून यांचा नातू कानव प्रताप हून यांचं लग्न लाहौरमधील सामिया सिद्धीक यांच्याशी झालं. या दोघांनी कोर्ट मॅरेज केले. कानव २७ वर्षाचे होते आणि सामिया २६ वर्षाची होती. हे दोघं दुबईमध्ये भेटले आणि त्यांच्यात प्रेम झाले. शाजिया सिद्दीक आणि मिया मोहम्मद सिद्दीक यांची मुलगी सामियाच्या लग्नाचे फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहेत. हून कुटुंब पाकिस्तानच्या एबटाबादशी संबंधित आहेत.

पाकिस्तानातून अनेक पाहुणे आले होते

त्या दिवशी ताज चंदीगड सेक्टर १७ येथे एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये वधू-वरांच्या बाजूने अनेक नातेवाईक उपस्थित होते. पाकिस्तानातूनही अनेक पाहुणे चंदीगडला आले होते. अनेक आमदारही पोहोचले होते. त्यावेळी ही मुलगी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कुटुंबातील असल्याचीही अफवा पसरली होती. त्यानंतर लेफ्टनंट जनरल हुन यांनी या अफवा फेटाळून लावल्या आणि त्या खोट्या असल्याचं सांगितलं. अशा गोष्टी करण्यापूर्वी लोकांनी माहिती केली पाहिजे. दोन्ही देशांतील लोकांमध्ये सौहार्द वाढवायला हवे असं त्यांनी सांगितले.

शाहबाज शरीफ यांचे भारत कनेक्शन

शाहबाज शरीफ यांचे वडील मोहम्मद शरीफ हे उद्योगपती होते ते काश्मीरमधील अनंतनाग येथून व्यवसायासाठी आले होते. २० व्या शतकाच्या सुरुवातीला जट्टी पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील उमरा गावात स्थायिक झाले. त्याच्या आईचे कुटुंब पुलवामा येथून आले होते. फाळणीनंतर, शाहबाज यांचे कुटुंब अमृतसरहून लाहोरला गेले जेथे त्यांनी त्यांच्या घराचे नाव 'जट्टी उमरा' असे ठेवले. शाहबाज यांनी पाच लग्ने केली. त्यांच्या सध्या नुसरत आणि तेहमीना दुर्रानी या दोन बायका आहेत. आलिया हानी, निलोफर खोजा आणि कुलसूम या तीन जणांना त्यांना घटस्फोट दिला आहे. त्यांना नुसरतपासून दोन मुले आणि तीन मुली आणि आलियापासून एक मुलगी आहे.  

Web Title: Pakistani Prime Minister Shahbaz Sharif's daughter got married in India? Know the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.