Fact Check: आधार कार्डवर फक्त 1 टक्के व्याजाने मिळतेय कर्ज? जाणून घ्या या पंतप्रधान योजनेबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 07:01 PM2021-08-02T19:01:47+5:302021-08-02T19:05:06+5:30
only 1% interest loan on Aadhar card: जर तुम्हाला कोणी सांगितले की, सरकार फक्त 1 टक्के व्याजाने कर्ज वाटत आहे, तर तुम्ही काय कराल? तुम्ही ते कर्ज घेण्याचा जरूर प्रयत्न कराल. नाही का.
जर तुम्हाला कोणी सांगितले की, सरकार फक्त 1 टक्के व्याजाने कर्ज वाटत आहे, तर तुम्ही काय कराल? तुम्ही ते कर्ज घेण्याचा जरूर प्रयत्न कराल. नाही का. अनेकजण गरज नसली तरीदेखील एक टक्क्याच्या व्याजाने हे कर्ज मिळतेय ना मग चला घेऊया म्हणतील आणि घेतील. (pardhanmantri yojana only 1% interest loan on Aadhar card is fake.)
देशातील सामान्य जनतेसाठी सर्वात स्वस्त लोन हे होम लोन आहे. यावर वार्षिक 7 टक्के व्याज लागते. कृषीसंबंधीत कर्ज हे 4 टक्के व्याजदराने मिळते. बाकी कुठेही यापेक्षा कमी व्याजदराने लोन मिळत नाही. मात्र, 1 टक्के व्याजदराने कर्ज मिळतेय, ही ऑफर काही छोटी नाहीय. पण तुम्हाला विचार करावा लागेल. गेल्या काही काळापासून अशाप्रकारचे फोटो असलेले मेसेज लोकांच्या मोबाईलवर येऊ लागले आहेत.
दावा: #WhatsApp पर साझा किए जा रहे एक मैसेज में यह दावा किया जा रहा है कि प्रधानमंत्री योजना के तहत आधार कार्ड के माध्यम से 1% ब्याज पर लोन मिल रहा है। #PIBFactCheck: यह दावा फर्जी है। केंद्र सरकार द्वारा 'प्रधानमंत्री योजना' नामक ऐसी किसी योजना के तहत लोन नहीं दिया जा रहा है। pic.twitter.com/fGJpE4Bs4A
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 2, 2021
व्हॉट्सअॅपवर अशाप्रकारचे 1 टक्के व्याजाचे पंतप्रधान योजनेचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, पंतप्रधान योजनेंतर्गत आधार कार्डवर 1 टक्के व्याजाने लोन मिळत आहे. यावर लिहिण्यात आले आहे की, पंतप्रधान योजना आधार कार्डद्वारे 1% व्याजदराने लोन, 50 टक्के सूट.
सरकारी एजन्सी PIBFactCheck ने याबाबत मोठा इशारा दिला आहे. आधार कार्डावरून लोन मिळण्याचा दावा करणारी ही योजना बोगस आहे, असे पीआयबीने म्हटले आहे. केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाहीय जी एवढ्या कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करते.