22 जानेवारीला जारी होणार राम मंदिरवाली 500 ची नवीन नोट? जाणून घ्या व्हायरल पोस्टचे सत्य...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 05:40 PM2024-01-17T17:40:00+5:302024-01-17T17:40:31+5:30
सोशल मीडियावर श्रीराम आणि राम मंदिर असलेल्या 500च्या नोटेचा फोटो व्हायरल होत आहे.
Ram Mandir Ayodhya: येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे अवघा देश राममय झालाय. मात्र या सोहळ्यापूर्वी अयोध्या आणि राम मंदिरासंदर्भात विविध प्रकारच्या पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत असून, त्यातील अनेक पोस्ट बनावट/खोट्या सिद्ध होत आहेत. 500 रुपयांच्या नोटेसंदर्भात एक पोस्ट व्हायरल होत आहे.
काय आहे दावा?
सोशल मीडियावर 500 रुपयांच्या नोटेचा फोटो व्हायरल होतोय, ज्याबद्दल दावा केला जातोय की, नवीन सीरीजची ही नोट 22 जानेवारीला जारी होणार आहे. यामध्ये महात्मा गांधींऐवजी प्रभू रामाचा फोटो दिसत आहेत. सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपद्वारे हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जातोय. दरम्यान, आता या व्हायरल पोस्टचे सत्य समोर आले आहे.
काय आहे 500 रुपयांच्या नोटेचे सत्य?
Sir This photo was edited by me it's just my imagination please don't spread wrong information https://t.co/JgNhkHpMjApic.twitter.com/qvw6JiOjiq
— wHatNext 🚩 (@raghunmurthy07) January 16, 2024
दावा खोटा निघाला:
प्रभू रामाचे चित्र असलेली 500 रुपयांची नोट बनावट असल्याचे समोर आले आहे. ही बनावट पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, या नोटेचा फोटो एडीट करणारा तरुण समोर आला. @raghunmurthy07 युजरनेम असलेल्या व्यक्तीने सांगितले की, हा फोटो त्याने स्वत: एडिट केला आहे. मात्र लोक चुकीचा मेसेज जोडून हा फोटो शेअर करत आहेत.
NEW 500 NOTES WILL BE ISSUED ON 22/01/2024
— 😇 ✍lαthα αѕhσkrαj 🇮🇳 (@TenthPlanet1) January 16, 2024
நிஜமா? 🤔🤔🤔🤔 pic.twitter.com/peiCwlr9oZ
यावरुन एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, 22 जानेवारी रोजी अशी कोणतीही नवीन नोट जारी होणार नाही. ज्याने या बनावट नोटेचा फोटो एडीट केला, त्याने स्वतः समोर येऊन याबाबत खुलासा केला आहे. त्यामुळे अशाप्रकारची पोस्ट तुमच्यापर्यंत आल्यावर ती काळजीपूर्वक तपासा.