Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 02:23 PM2024-05-11T14:23:16+5:302024-05-11T17:20:21+5:30
Fact Check : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये योगी "बॅनर हटवा अन्यथा मी तुम्हाला कायमचं बेरोजगार करेन" असं म्हणताना दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे.
Created By: The Quint
Translated By: ऑनलाइन लोकमत
लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री योगी "बॅनर हटवा अन्यथा मी तुम्हाला कायमचं बेरोजगार करेन" असं म्हणताना दिसत आहे.
दावा - संपूर्ण संदर्भ न देता सोशल मीडियावर अलीकडेच हा व्हिडीओ व्हायरल केला जात आहे.
या पोस्टचे अर्काइव येथे पाहा
(सोर्स – स्क्रीनशॉट)
(तुम्ही येथे, येथे आणि येथे समान दावे करणाऱ्या इतर पोस्टचे अर्काइव पाहू शकता.)
हा दावा खरा आहे का? नाही, हा दावा खरा नाही.
योगी आदित्यनाथ यांचा हा व्हिडीओ नुकत्याच झालेल्या रॅलीचा नसून 2019 चा आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे योगींच्या रॅलीत बीटीसीचे विद्यार्थी निदर्शने करण्यासाठी आले होते.
त्यांना पाहून योगी आदित्यनाथ म्हणाले होते, "बॅनर उतरवा नाहीतर तुम्ही कायमचे बेरोजगार व्हाल. त्यांना हटवा, अशा लोकांना आधी बाहेर काढा."
आम्ही सत्य कसं शोधलं?
आम्ही व्हायरल व्हिडिओला कीफ्रेममध्ये विभाजित केलं आणि Google लेन्सच्या मदतीने इमेज सर्च केल्या. आम्हाला X (पूर्वी Twitter) युजर्सकडून 2019 ची पोस्ट सापडली ज्यामध्ये हा व्हिडीओ होता.
आगरा में बीटीसी प्रशिक्षित सीएम साहेब के सामने जब अपनी माँगो को लेकर प्रदर्शन करने पहुँचे तो जवाब क्या मिला!!
— Anand Prakash (@anand11_du) April 14, 2019
"ये बैनर नीचे कर लो, नहीं तो हमेशा के लिये बेरोजगार रह जाओगे. ऐसे नमूनों को पहले ही बाहर कर दिया करो"
UP public should be so lucky to have a CM some one like him. 👏 pic.twitter.com/IRUcUtnEcA
याशिवाय, X (पूर्वीचे ट्विटर) वरील इतर युजर्सनी देखील 2019 मध्ये हा व्हिडीओ पोस्ट केला होता. ती पोस्ट तुम्ही इथे पाहू शकता.
न्यूज रिपोर्ट्स : या प्रकरणाशी संबंधित कीवर्ड शोधताना, आम्हाला जनसत्ताचा एक रिपोर्ट सापडला ज्याची हेडलाईन होती "बैनर नीचे कर दो नहीं तो हमेशा के लिए बेरोजगार रह जाओगे, विरोध प्रदर्शन को लेकर बोले सीएम योगी"
जनसत्ताने 19 फेब्रुवारी 2021 रोजी ही बातमी प्रसिद्ध केली होती.
(स्रोत – स्क्रीनशॉट/जनसत्ता/क्विंट हिंदी)
वनइंडिया हिंदी नावाच्या वेबसाईटनेही योगी आदित्यनाथ यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचा रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. हे देखील 19 फेब्रुवारी 2020 रोजी अपलोड केले होते.
निष्कर्ष
योगी आदित्यनाथ यांचा जुना व्हिडीओ नुकताच लोकसभा निवडणुकीदरम्यान व्हायरल होत आहे.
(सदर फॅक्ट चेक The Quint या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)