वक्तृत्वकलेबद्दलच्या ५ गैरसमजुती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:16 AM2016-01-16T01:16:16+5:302016-02-06T13:56:24+5:30

शेकडो लोकांसमोर एकट्याने स्टेजवर उभा राहून भाषण देणे खूप लोकांना फार अवघड गोष्ट वाटते. मात्र काही वक...

5 misconceptions about rhetoric | वक्तृत्वकलेबद्दलच्या ५ गैरसमजुती

वक्तृत्वकलेबद्दलच्या ५ गैरसमजुती

Next
कडो लोकांसमोर एकट्याने स्टेजवर उभा राहून भाषण देणे खूप लोकांना फार अवघड गोष्ट वाटते. मात्र काही वक्ते असे असतात जे हजारोंच्या गर्दीलाही आपल्या ओजस्वी वाणीने जिंकून घेतात. असे वक्ते इतके छान भाषण कसे काय देऊ शकतात, याचे अनेकांना आश्‍चर्य वाटते. जेव्हा यासंबंधी अभ्यास करण्यात आला तेव्हा अनेक रंजक बाबी समोर आल्या. या रंजक बाबींसोबतच भाषणाबद्दलच्या काही गैरसमजुतीबद्दलही माहिती मिळाली. कुठल्या आहेत या गैरसमजुती बघूयात..

१. भाषण ही जन्मजात कला आहे : अनेक लोकांना असे वाटते की जे लोक चांगले भाषण करतात त्यांना जन्मजातच ही कला अवगत असते. मात्र हा फार मोठा गैरसमज आहे. सरावाने वक्तृत्वकला ही विकसित केली जाऊ शकते. आत्मविश्‍वासाच्या बळावर आपल्यातील न्युनगंड दूर केला तर कोणीही चांगले भाषण करू शकतो.

२. उत्तम भाषणकर्ते घाबरत नाहीत : कितीही अनुभवी किंवा एक्सपर्ट स्पीकर असू द्या, भाषणाआधी त्याला थोडी भीती वाटत असते. भाषण कसे होईल याची त्यांनासुद्धा धाकधूक लागलेली असते. मात्र या भीतीला ते आत्मविश्‍वासाने ओव्हरकम करतात. उत्तम वक्तृत्वपटूची हीच तर खासियत असते.

३. मितभाषी लोक कधीच स्पीकर नाही बनू शकत :भाषण केवळ जास्त बोलणार्‍यांनीच करावे असा नियम नाही. तुम्ही जरी कमी बोलत असाल तरीसुद्धा तुम्ही चांगले भाषण करू शकता. उलट शांत, विनम्र लोकच मुद्देसुद, विचारांची सुसूत्रपणे मांडणी करून उत्तम भाषण करतात. याचे उदाहरण म्हणजे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी.

४. चांगले पाठांतर करूनच चांगले भाषण करता येते : घोकंपट्टी करून कोणतीच गोष्ट चांगली होत नाही. तर मग भाषण तरी कसे होणार? पाठ केलेल्या गोष्टी केवळ स्टेजवर टेप रेकॉर्डरवर रेकॉर्ड केल्यागत बोलायच्या नसतात. जागा, प्रसंग, प्रेक्षक आणि विषय पाहून भाषण करावे लागते.

cnxoldfiles/em> प्रभावीपणे भाषण करण्यासाठी स्टेजवर एकदम ताठ उभे रहावे लागते हा सुद्धा लोकांना गैरसमज असतो. परंतु प्रामाणिक, मनापासून बोलणे हीच चांगल्या भाषणाची चिन्हे आहेत. तुम्ही कसे उभे राहता, उभे राहता की बसून भाषण करता यापेक्षा तुम्ही काय बोलता हे जास्त महत्त्वाचे असते.

Web Title: 5 misconceptions about rhetoric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.