​यशस्वी होण्यासाठी ‘या’ ५ गोष्टी आवश्यक !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2017 10:06 AM2017-05-25T10:06:22+5:302017-05-25T15:36:22+5:30

दिवसेंदिवस स्पर्धा वाढत असून प्रत्येकजण यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. यासाठी आपल्या मुलांना हार्ड वर्कबरोबरच स्मार्ट वर्कदेखील करायला शिकविले पाहिजे.

5 'things' needed to be successful! | ​यशस्वी होण्यासाठी ‘या’ ५ गोष्टी आवश्यक !

​यशस्वी होण्यासाठी ‘या’ ५ गोष्टी आवश्यक !

Next
वसेंदिवस स्पर्धा वाढत असून प्रत्येकजण यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. यासाठी आपल्या मुलांना हार्ड वर्कबरोबरच स्मार्ट वर्कदेखील करायला शिकविले पाहिजे. कारण हे सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेत खूपच आवश्यक आहे. वेळेची कमतरता आणि या जीवघेण्या स्पर्धेमुळे कामाचा तणाव अधिकच वाढला आहे. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आपल्या अंगी कोणते गुण आवश्यक आहेत याबाबत जाणून घेऊया. 

* स्मार्ट वर्क
कठोर परिश्रमाला जरी पर्याय नसला तरी, वर्तमान स्थितीत कठोर परिश्रमाबरोबरच स्मार्ट वर्कदेखील तेवढेच आवश्यक आहे. 

* योग्यता
आपण जे ही काही करीत आहेत किं वा करणार आहात, आपल्या या इच्छेनुसार आपल्यातील योग्यता वाढवा. म्हणजेच त्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी स्वत:ला सक्षम करा. 

* दूरदृष्टि
जे काही ध्येय ठरवाल त्याबाबत दूरदृष्टिने विचार करुनच ठरवा. असा विचार करा की, याचा दूरगामी काय परिणाम होऊ शकतात.  

* परिश्रम
कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. यश मिळविण्यासाठी योग्य मार्गाच्या निवडीबरोबरच ध्येय प्राप्तीसाठी सतत परिश्रम करा. 

* प्रामाणिक
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी स्वत:प्रति प्रामाणिक असणे खूप आवश्यक आहे. शिवाय तेवढेच प्रामाणिक आपल्या कामाच्या प्रतिदेखील असणे आवश्यक आहे. 

Web Title: 5 'things' needed to be successful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.