बुडालेल्या जहाजाचा 500 वर्षांनी लागला शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2016 01:19 AM2016-03-20T01:19:32+5:302016-03-19T18:19:32+5:30
वास्को द गामाचे बुडालेले जहाज अखेर सापडले आहे.
Next
16 ्या शतकात युरोपातून भारतात समुद्री मार्गाने प्रवास करणारा पहिला युरोपियन वास्को द गामाचे बुडालेले जहाज अखेर सापडले आहे. 500 वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजाचे अवशेष ओमानजवळ समुद्रात होते.
विशेष म्हणजे जहाजाच्या अवशेषांसोबतच चांदीची काही दुर्मीळ नाणीही पुरातत्त्व विभागाच्या अधिकाºयांना सापडली आहेत. ‘वास्को द गामा’च्या नावाड्यांनी ही पोतुर्गीज जहाज समुद्रात नेले होते, मात्र हिंदी महासागरात अल-हलानियाह बेटाजवळ जोरदार वादळामुळे जहाज बुडाल्याची माहिती आहे. मे 1503 मध्ये घडलेल्या दुर्घटनेत जहाजाचे कमांडर विसेन्ट सॉडरसह सर्वांना जलसमाधी मिळाली.
2013 मध्ये ब्ल्यू वॉटर रिकव्हरीज आणि ओमान मिनिस्ट्री आॅफ हेरिटेज अँड कल्चरने जहाजाचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली. इंडियो नावाची दुर्मीळ चांदीची नाणी, सिरॅमिक्स, एक घंटा अशा वस्तू सापडल्या आहेत.