​इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स वाढवण्याच्या ७ टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2016 04:08 PM2016-10-01T16:08:19+5:302016-10-01T21:39:50+5:30

तुम्हाला पण इन्स्टाग्रामवर सारखे लोकप्रिय व्हायचे असेल तर पुढील सात टिप्स फॉलो करा.

7 Tips to Increase Falowser on Instagram | ​इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स वाढवण्याच्या ७ टिप्स

​इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स वाढवण्याच्या ७ टिप्स

Next
शल मीडियाच्या महासागरात सर्वांत लोकप्रिय बेट म्हणजेच फोटो शेअरिंग अ‍ॅप/वेबसाईट ‘इन्स्टाग्राम’. तरुणांपासून ते सेलिब्रेटिंना इन्स्टाग्रामने वेड लावले आहे.

दिवसेंदिवस अधिक डिजिटल होत चालल्या स्मार्टफोन्समुळे तर हौशी फोटोग्राफर/प्रेमींची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे इन्स्टाग्रामवर यूजर्सची संख्यासुद्धा झपाट्याने वाढत आहे. इन्स्टाग्रामवर जास्तीत जास्त फॉलोवर्स मिळवण्यासाठी लोकांची धडपड असते. अमेरिकेत सुमारे पाच हजार लोक ‘इन्स्टाग्राम’वर फेमस कसे व्हावे?’ असे गुगलवर सर्च करत असतात. यावरून इन्स्टाची क्रेझ लक्षात येईल.

असे कित्येक लोक आहेत ज्यांनी या प्लॅटफॉर्मलाच आपले करियर बनवले आहे. यूट्यूबनंतर लोकांना आता इन्स्टाग्रामदेखील करिअर म्हणून खुणावू लागले आहे. तुम्हाला पण इन्स्टाग्रामवर सारखे लोकप्रिय व्हायचे असेल तर पुढील सात टिप्स फॉलो करा.

* तुमची खासियत काय?

फॉलोवर्स आकर्षित करायचे असतील तर तुमच्याकडे एक काही तरी खास गोष्ट असली पाहिजे. म्हणजे तुमची आवड काय, तुम्हाला कशा प्रकारचे फोटो आवडतात हे ठरवा. उदा. तुम्हाला पर्यटन आवडते. मग विविध शहरांचे सुंदर फोटो शेअर करा. बघा समान आवडीचे लोक तुम्हाला फॉलो करतील. हळूहळू तुमची आॅडियन्स बिल्ड अप करा.

Insta

* नियममित पोस्ट करा
सोशल मीडिया वेळ खाऊ काम ठरू शकते. परंतु आठवडा-महिन्यातून कधीतरी पोस्ट करून तुम्ही फेमस नाही होऊ शकत. त्यासाठी नियमित अ‍ॅक्टिव्ह राहणे गरजेचे आहे. रोजच्या रोज ठराविक प्रमाणात क्रिएटिव्ह फोटो शेअर करत राहा. तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग म्हणून तर इन्स्टाग्राम सर्वात कूल माध्यम आहे. पण हो, उगीच निरर्थक पोस्टस् करू  नका.

* क्रिएटिव्ह हॅशटॅग
सोशल मीडियामध्ये हॅशटॅग म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. चांगले आणि विषयानुरूप हॅशटॅग वापरून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकता. फोटो कॅप्शनमध्ये मोजकेच पण क्रिएटिव्ह हॅशटॅग वापरा. कॅप्शन देतानाही थोडं डोकं चालवा. वाईट आणि सुमार कॅप्शन चांगल्या फोटोचे महत्त्व कमी करू शकते. म्हणून सुंदर कॅप्शन आणि हॅशटॅग यांचे परफेक्ट कॉम्बिनेशन वापरून फोटो शेअर करा.

Insta
* फोटो क्वालिटी कंपोझिशन

आजकाल स्मार्टफोन्स एवढे अद्ययावत आहेत की, डिजिटल कॅमेर्‍यागत फोटो काढता येतात. इन्स्टाग्रामवरील फोटोगर्दीतून तुमचे निराळेपण दिसण्यासाठी ‘क्वालिटीबाज’ फोटो शेअर करा. उगीच काही तरी क्लिक केले आणि टाकले इन्स्टाग्रामवर असे मुळीच क
रू नका. लोकांना पाहायला आवडतील असेच फोटो शेअर करा.

* फोटो एडिटिंग अ‍ॅप

इन्स्टाग्राम देत असलेले फिल्टर्स चांगले जरी असले तरी त्यांची संख्या मर्यादित आहे. फोटो व्हॅल्यू वाढविण्यासाठी खूप सारे चांगले फोटो एडिटिंग अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून फोटोला एक वेगळेच रुप तुम्ही देऊ शकता. स्नॅपसीड, रेट्रिका, आफ्टरलाईट अशी काही उदाहरणे सांगता येतील. इन्स्टाग्रामसाठी चांगले फोटो एडिटिंग अ‍ॅप कम्पलसरी आहे असेच समजा.

Insta

* हटके असू द्या

अधुनमधून तुमच्या आवडत्या विषया व्यतिरिक्त काही फोटो शेअर करत चला. त्यामुळे फॉलोवर्सना पण थोडासा चेंज मिळेल. अनेकदा काय होते की, एकाच प्रकारचे तेच तेच फोटो पोस्ट केल्यामुळे एकसुरीपणा येतो. म्हणून थोड्याफार कालांतराने हटके फोटो टाकत जा. फॉलोवर्सच्या आवडीच्या विषयाचे फोटो त्यासाठी बेस्ट आॅप्शन आहे.

* दुसऱ्यांनाही महत्त्व द्या

शेवटचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे केवळ स्वत:लाच महत्त्व देऊ नका. वेळोवेळी इतरांच्या फोटोंना लाईक केले पाहिजे. फक्त स्वत:च्या फोटोंमुळे फॉलोवर्स वाढत नसतात. त्यासाठी इतरांशी संवाद साधला पाहिजे. आपल्या आवडत्या विषयावर कमेंट-लाईक केल्यामुळे तुमचा सक्रीय सहभाग दिसतो. तुमचा नियमित वावर दिसला की, आपोआप एक-एक करत नवीन फॉलोवर्स जोडले जातात.

Web Title: 7 Tips to Increase Falowser on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.