अबब..! जेग्वारची किंमत दहा कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2016 01:53 AM2016-04-07T01:53:45+5:302016-04-06T18:53:45+5:30

जेग्वार एक्सकेएसएस’ या 1957 मॉडेलची कंपनी जशास तशी निर्मिती करणार आहे. 

Abh ..! The price of cigar is about 10 crores | अबब..! जेग्वारची किंमत दहा कोटी

अबब..! जेग्वारची किंमत दहा कोटी

Next
ुनं ते सोनं’ असे म्हणण्यामागे काय कारण असू शकते हे जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचलीच पाहिजे. अनेक कार कंपन्या त्यांच्या विंटेज कार मॉडेलची अधूनमधून पुनरनिर्मिती करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात.

याबाबती ‘जेग्वार’चा कोणीही हात धरू शकत नाही. गेल्यावर्षी लाईटवेट ई-टाईप कारची निर्मिती केल्यावर कंपनी आता अजुन एक कार पुन्हा तयार करणार आहे.

आतापर्यंतची सर्वांत स्टाईलिश आणि कार संग्रहाकांची फेव्हरेट ‘जेग्वार एक्सकेएसएस’ या 1957 मॉडेलची कंपनी जशास तशी निर्मिती करणार आहे. 1957 मध्ये जे  एक्सकेएसएस कारचे स्पेसिफिकेशन्स होते अगदी त्याच धरतीवर केवळ 9 गाड्या तयार करण्यात येणार आहेत.

1957 साली जेग्वारने त्यांच्या 25 रेस कार रोड कारमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु 16 एक्सकेएसएस कारच्या निर्मितीनंतर कारखान्याला लागलेल्या भीषण आगीमुळे हा प्रोजेक्ट बंद पडला.

या 16 कारपैकी सध्या के वळ 12 कार उपलब्ध आहेत. अत्यंत दुर्मिळ आणि वेगवान असलेली ही कार जेग्वार कंपनीची संग्रहाकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय कार आहे.

लिमिटेड एडिशनमध्ये तयार करण्यात येणाऱ्या 9 कारची किंमत प्रत्येकी 1.5 मिलियन डॉलर्स (सुमोर 10 कोटी रु.) इतकी असणार आहे. ही किंमत जरी अतिजास्त वाटत असली तरी हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅक्वीन असलेल्या  याच ‘एक्सकेएसएस’ कारची आज किंमत 30 मिलियन डॉलर्स (सुमोर 200 कोटी रु.) एवढी प्रचंड आहे.

Web Title: Abh ..! The price of cigar is about 10 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.