'या' सेलिब्रेटींचे आहेत स्वतःचे फॅशन ब्रँड्स; तुम्हीही ट्राय करू शकता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 08:34 PM2019-01-31T20:34:22+5:302019-01-31T20:35:57+5:30
जेव्हा गोष्ट फॅशन आणि स्टाइलची असते, तेव्हा जास्तीत जास्त लोक ज्यांना फॉलो करतात ते म्हणजे बॉलिवूड सेलिब्रिटी... मग तो सेलिब्रिटींचा रेड कारर्पेट लूक असो किंवा इव्हेंट लूक, जिम लूक असो किंवा एअरपोर्ट लूक.
जेव्हा गोष्ट फॅशन आणि स्टाइलची असते, तेव्हा जास्तीत जास्त लोक ज्यांना फॉलो करतात ते म्हणजे बॉलिवूड सेलिब्रिटी... मग तो सेलिब्रिटींचा रेड कारर्पेट लूक असो किंवा इव्हेंट लूक, जिम लूक असो किंवा एअरपोर्ट लूक. अनेक लोक सर्रास बॉलिवूड सेलिब्रिटींना हुबेहुब कॉपी करताना दिसतात. या सेलिब्रिटींनी काहीही वेअर केलं की, ती फॅशन झालीच म्हणू समजा. अशातच तुम्हालाही सलिब्रिटींचे कपडे वेअर करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला त्यासाठी लाखो रूपये खर्च करण्याची गरज नाही. असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांचे स्वतःचे फॅशन ब्रँड्स आहेत आणि जिथून तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये स्टायलिश कपडे खरेदी करू शकता.
सलमान खान- Being Human
बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानच्या बीइंग ह्यूमन ब्रँडबाबत तर आपण सारेच जाणतो. सलमान त्या सेलिब्रिटींपैकी एक आहे, ज्यांने आपला स्वतःचा क्लोथिंग ब्रँड सुरू केला होता. बीइंग ह्यूमन ब्रँडच्या फॅशनेबल आणि स्टायलिश कपड्यांव्यतिरिक्त अनेक हटके एक्सेसरीजही मिळतात. येथे फक्त मुलांसाठीच नाही तर मुलींसाठीही अनेक फॅशनेबल कपडे मिळतात. अशातच जर तुम्हीही डायहार्ट सलमान फॅन असाल तर तुम्हीही बीइंग ह्यूमनचे कपडे वेअर करू शकता. सायकलिंगचा शौक ठेवणाऱ्या सलमानने आता बीइंग ह्यूमन ब्रँडच्या सायकल्सही तयार करण्यास सुरुवात केली आहे.
सोनम कपूर- Rheson
बॉलिवूडची फॅशनिस्ता सोनम कपूर आणि तिची छोटी बहिण रिया कपूर दोघींनी एकत्र येऊन स्वतःची क्लोथिंग लाइन सुरू केली आहे. हिच गोष्ट लक्षात घेऊन shoppers stop सोबत पार्टनरशिप करून सोनम आणि रियाने एका कॅज्युअल वेअर ब्रँडची सुरुवात केली. या ब्रँडला त्यांनी Rheson असं नाव दिलं आहे. या ब्रँडच्या कपड्यांना तुम्ही अगदीच परवडणाऱ्या किमतीमध्ये खरेदी करू शकता.
अनुष्का शर्मा- NUSH
सोनम फॅशनमध्ये सतत वेगवेगळ्या एक्सपरिमेंट करताना दिसून येते. तर त्याउलट अनुष्का शर्माची स्टाइल फार क्लीन, क्यूट आणि फंक्शनल असते. अनुष्का नेहमी ज्या स्टाइल्सचे कपडे वेअर करते ते तुम्ही कुठेही वेअर करू शकता आणि सामन्य महिला किंवा तरूणीही त्यामध्ये अगदी कंम्फर्टेबल असतात. यामुळेच अनुष्काने Myntra सोबत पार्टनरशिप करून आपल्या पर्सनल स्टाइल लक्षात घेऊन क्लोथिंग लाइन सुरू केली ज्याचं नाव NUSH आहे. हा फॅशन ब्रँड सध्या तरूणींमध्ये आपल्या मोनोटोन आउटफिट्स, क्लीन कट्स आणि कमी किमतीसाठी ओळखला जातो.
दीपिका पादुकोण- All About You
अनुष्का शर्माप्रमाणे पद्मावत अभिनेत्री दीपिका पादुकोणने देखील Myntra सोबत पार्टनशिप करून आपली क्लोथिंग लाइन सुरू केली आहे. ज्याचं नाव आहे, 'All About You'. या फॅशन ब्रँडमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारचे आणि स्टाइल्सचे कपडे मिळतात. दीपिकाच्या या एक्सक्लूसिव्ह क्लोथिंग लाइनमध्ये बायकर जॅकेट्सपासून ब्रोकेड कुर्तादेखील अवेलेबल आहे.
रितिक रोशन- HRX
इंडियन मार्केटमधील सर्वात पॉप्युलर ब्रँड्सपैकी एक म्हणजे, रितिक रोशनचा एक्सक्ल्यूझिव्ह असणारा HRX ब्रँड. या ब्रँडमध्ये मेल आणि फिमेल दोघांसाठी स्पेशल स्पोर्ट्सवेअर अवेलेबल आहेत. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या एक्ससरीजदेखील उपलब्ध आहेत.
मलाइका, बिपाशा आणि सुजैन- The Label Life
बॉलिवूडच्या तीन स्टायलिश दीवाज मलायका अरोरा, बिपासा बासू आणि रितिक रोशनची एक्स वाइफ सुजैन खानने एकत्र येऊन एक क्लोथिंग लाइन सुरू केली आहे. ज्याचं नाव The Label Life असं ठेवण्यात आलं आहे. येथे तुम्हाला कॅज्युअल वेअरपासून ते फॉर्मल वेअरपर्यंत एकापेक्षा एक क्लासी लूक असलेले कपडे, शूज मिळतील.
विराट कोहली- one8
बॉलिवूड सेलिब्रिटींव्यतिरिक्त इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीचीही आपली क्लोथिंग लाइन आणि फॅशन ब्रँड आहे. ज्याचं नाव one असं आहे. कोहली आपल्या फिटनेससोबत स्टायलिश आउटफिट्ससाठीही ओळखला जातो. त्याची स्टाइल त्याच्या फॅन्ससाठीही खास आहे. त्यामुळेच कोहलीन प्रसिद्ध स्पोर्ट्स ब्रँड Puma सोबत पार्टनरशिप करून one8 नावाचा फॅशन ब्रँड सुरू केला आहे. ज्यामध्ये स्पोर्ट्स वेअर, परफॉर्मन्स अपॅरल्स आणि फुटवेअरही अवेलेबल आहेत.