​तिशीनंतर पुरुषांपेक्षा जास्त महिला असतात सोशल अ‍ॅक्टिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2016 05:19 AM2016-04-14T05:19:50+5:302016-04-13T22:19:50+5:30

 वयाच्या तिशीनंतर पुरुषांची सामाजिक सक्रियता कमी होते तर महिलांची वाढते.

After more than three months there are more women than Social Activists | ​तिशीनंतर पुरुषांपेक्षा जास्त महिला असतात सोशल अ‍ॅक्टिव्ह

​तिशीनंतर पुरुषांपेक्षा जास्त महिला असतात सोशल अ‍ॅक्टिव्ह

Next
ेक महिलांची तक्रार असते की, त्यांचे पती एखाद्या समारंभाला जाण्यास कंटाळा करतात. त्यानंतर ‘आता तुम्ही पहिल्यासारखे नाही राहिले’ हा पत्नीचा ठरलेला डायलॉग असतो. याचे कारण आहे की, वयाच्या तिशीनंतर पुरुषांची सामाजिक सक्रियता कमी होते तर महिलांची वाढते.

एका भारतीय संशोधकाचा सामावेश असलेल्या एका रिसर्च टिमने केलेल्या अध्ययनातून असे दिसून आले की, वयानुसार पुरूषांचा मित्रपरिवार कमी होऊ लागतो. ‘सोशल गॅदरिंग अ‍ॅक्टिव्हिटिज्’मध्ये पुरुषांचा रस कमी होतो. 

फिनलँडमधील ‘आल्टो विद्यापीठातील’ कुणाल भट्टाचार्य यांनी सांगितले की, तरुण मुलं तरुण मुलींपेक्षा अधिक सक्रिय असतात परंतु वयानुरूप हे पॅटर्न बदलते. वयाच्या 25व्या वर्षानंतर पुरुषांचे सोशल सर्कल घटू लागते आणि चाळीशीच्या शेवटी स्थिरावते. साठीनंतर पुरुष इतरांशी जास्त मिसळण्यास जास्त उत्सुक नसतात.

या संशोधनामध्ये युरोपमधील एका देशाच्या तीस लाख लोकांच्या मोबाईल संभाषणांचा अभ्यास करण्यात आला. वव्याच्या 25 व्या वर्षी स्त्री आणि पुरुष दोघांचाही समाजात मोठ्या प्रमाणावर वावर असतो. भट्टाचार्य सांगातात की, वयाच्या या टप्प्यावर पुरुष कॅज्युअल रिलेशनशिपला महत्त्व देतात तर, महिलांचा कल प्रेम संबंधाकडे जास्त असतो.

Web Title: After more than three months there are more women than Social Activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.