​वयाच्या ७५ व्या वर्षी फुलबॉलपटू पेले करणार तिसरे लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2016 12:27 PM2016-07-10T12:27:00+5:302016-07-10T17:57:00+5:30

एकीकडे युरो कपच्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच फुटबॉल जगतात आणखी एक बातमी चर्चेचा विषय ठरली आहे. होय, जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणल्या जाणारा ब्राझीलचा नामवंत फुटबॉल खेळाडू पेले हा वयाच्या ७५ व्या वर्षी त्याच्या४२ वर्षीय प्रेयसीसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे .

At the age of 75, at the age of the third wedding of footballer Pelé! | ​वयाच्या ७५ व्या वर्षी फुलबॉलपटू पेले करणार तिसरे लग्न!

​वयाच्या ७५ व्या वर्षी फुलबॉलपटू पेले करणार तिसरे लग्न!

Next
एकीकडे युरो कपच्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच फुटबॉल जगतात आणखी एक बातमी चर्चेचा विषय ठरली आहे. होय, जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणल्या जाणारा ब्राझीलचा नामवंत फुटबॉल खेळाडू पेले  हा वयाच्या ७५ व्या वर्षी  त्याच्या४२ वर्षीय प्रेयसीसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. हे पेलेचे तिसरे लग्न असेल.येत्या मंगळवारी पेले त्याची प्रेयसी मार्सिया सीबीली आओकी हिच्यासोबत विवाह करणार आहे. साओ पावलो येथे छोटेखानी समारंभात पेले विवाहबद्ध होणार आहे. मार्सिया ही जपानी आहे. १९८० साली न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदा पेलेची मार्सियाबरोबर ओळख झाली होती. पण तेव्हा ते परस्परांच्या प्रेमात पडले नव्हते. महिला व्यावसायिक असलेली ४२ वर्षीय मार्सिया ही २०१२ सालापासून पेलेसोबत विविध कार्यक्रमात उपस्थित राहू लागली होती. यावेळी आपल्याला आयुष्यातील खरे प्रेम मिळाल्याची प्रतिक्रिया पेले याने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली. पेले याचे यापूर्वी दोन विवाह झाले आहेत. रोसेमेसी चोलबी या पूर्वपत्नीपासून त्याला तीन मुले आहेत. फुटबॉल इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये पेलेची गणना होते. ब्राझीलला फुटबॉलचा वर्ल्डकप जिंकून देण्यात पेलेने महत्वाची भूमिका बजावली होती. १३६३ फुटबॉल सामन्यांमध्ये १२८१ गोल केल्याची कामगिरी पेले याच्या नावावर आहे.  

{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: At the age of 75, at the age of the third wedding of footballer Pelé!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.