मद्यसेवन तपासण्यासाठी आता येणार अल्को-बुथ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:06 AM2016-01-16T01:06:00+5:302016-02-05T10:21:12+5:30

'ड्रंक अँड ड्राईव्ह' ही फार गंभीर समस्या ट्रॅफिक पोलिसांसमोर आहे. ३१ डिसेंबर, २0१५ रोजी एकाटा मुंबइ...

Alco-Booth will now come to check alcohol consumption | मद्यसेवन तपासण्यासाठी आता येणार अल्को-बुथ

मद्यसेवन तपासण्यासाठी आता येणार अल्को-बुथ

Next
'
;ड्रंक अँड ड्राईव्ह' ही फार गंभीर समस्या ट्रॅफिक पोलिसांसमोर आहे. ३१ डिसेंबर, २0१५ रोजी एकाटा मुंबइत ७0५ लोक दारूच्या नशेत तर्र्र होऊन गाडी चालवताना पकडण्यात आले. गेली सात वर्षे याविरोधात मोहिम हाती घेऊनही काहीच फरक न पडल्याचे दिसून आले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता प्रत्येक बारमध्ये 'अल्को-बुथ' बसविण्याची योजना आहे. या बुथमध्ये तुमच्या श्‍वासावरून अल्कोलचे प्रमाण तपासण्यात येणार आहे. गरजेपेक्षा जास्त अल्कोहोल सेवन केले असता गाडी न चालवता टॅक्सीने घरी जाण्याचा पर्याय असणार आहे. बर्‍याच महिन्यांपासून मुंबईपोलिस मद्यपी ड्रायव्हर्सवर आळा बसविण्यासाठी विविध उपयांचा विचार करत होते. त्यातूनच या 'अल्को-बुथ'ची संकल्पना पुढे आली. प्रत्येक बारमालकाला हे बुथे विकत घेणे अनिवार्य असणार आहे.

Web Title: Alco-Booth will now come to check alcohol consumption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.