ALERT : सावधान! मोफत वाय फाय वापरताय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2017 12:42 PM2017-02-02T12:42:26+5:302017-02-02T18:12:26+5:30

मोफत वाय-फायच्या ठिकाणी तुमचा वैयक्तिक डेटा चोरून घेण्यासाठी अनेक गुन्हेगार बसलेले असतात. त्यामुळे या मोफत वाय-फायच्या सुविधेमुळे सायबर क्राईमची शक्यता अधिक वाढते.

ALERT: Careful! Using free Wi-Fi? | ALERT : सावधान! मोफत वाय फाय वापरताय?

ALERT : सावधान! मोफत वाय फाय वापरताय?

Next
ong>-Ravindra More

आज प्रत्येकाच्या आयुष्यात इंटरनेट हा अविभाज्य घटक बनला आहे. त्यासाठी कुठेही गेल्यावर इंटरनेट उपलब्ध आहे का याचा शोध सगळे घेतात. आजकाल  कॅफे, मॉल, हॉटेल व इतर सार्वजनिक ठिकाणी बहुधा मोफत वाय-फाय उपलब्ध असते. म्हणून दिवसेंदिवस इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढत आहे. मात्र अशा मोफत वाय-फायच्या ठिकाणी तुमचा वैयक्तिक डेटा चोरून घेण्यासाठी अनेक गुन्हेगार बसलेले असतात. त्यामुळे या मोफत वाय-फायच्या सुविधेमुळे सायबर क्राईमची शक्यता अधिक वाढते. 

मोफत वाय-फाय वापरताना काय काळजी घ्याल

*नाव व्यवस्थित तपासा
मूळ नेटवर्कच्या नावानेच स्वत:चे नाव ठेवून वाय-फाय वापरणाºयांना हॅकर्स मोफत वाय-फाय झोनमध्ये वापरकर्त्यांना मूर्ख बनवतात. अशावेळी जर हॅकरच्या नेटवर्कशी तुम्ही कनेक्ट झालात तर तुमचा वैयक्तिक डेटा हॅकरला सहज मिळू शकतो. 

* मोबाइल किंवा लॅपटॉपचा पासवर्ड रिसेट करू नका 
मोफत वायफाय झोनमध्ये पासवर्ड रिसेट करु नका कारण असे केल्याने आपला पासवर्ड हॅकर्स सहज मिळवू शकता यामुळे असे करणे धोक्याचे ठरू शकते.

* शेअरिंग आॅफ करा 
मोफत वायफाय वापरताना फोन किंवा लॅपटॉपचे शेअरिंग आॅन राहिल्यास सायबर गुन्हेगार तुमच्या पर्यंत सहज पोहोचू शकतील. यासाठी आपल्या फोन किंवा लॅपटॉपचे शेअरिंग आॅफ करा. यामुळे सायबर गुन्हेगार तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. इंटरनेट वापरून झाल्यावर फॉरगेट नेटवर्क अवश्य करा. अन्यथा पुन्हा रेंजमध्ये आल्यावर हे पुन्हा कनेक्ट होईल. 

* वापर झाल्यानंतर लॉगआऊट करायला विसरू नका 
तुम्ही सर्व अकाउंटमधून लॉगआऊट झालाय हे निश्चित करून घ्या. तसे केले नाही तर सायबर धोका होऊ शकतो. इंटरनेटचा वापर झाला की लॉगआऊट करा. 

* व्हीपीएन वापरा 
सुरक्षित इंटरनेट वापरण्यासाठी व्हीपीएन इन्स्टॉल करा. व्हीपीएन म्हणजे व्हर्च्युअल प्लेस नेटवर्क. यामुळे तुम्ही सुरक्षित इंटरनेट वापरू शकता. हे इन्स्टॉल केल्यामुळे मोफत वाय-फाय झोनमधील सायबर क्राईमपासून आपल्या फोनला वाचवता येते.  

Web Title: ALERT: Careful! Using free Wi-Fi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.