ALERT : क्रेडिट कार्ड वापरण्याअगोदर जाणून घ्या या गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2017 11:17 AM2017-02-08T11:17:35+5:302017-02-08T16:52:28+5:30
आपला देश हळूहळू कॅशलेस इकॉनॉमीकडे वळतोय. अशातच प्लास्टिक मनी म्हणजेच क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सचा प्रयोग वाढत आहे. यासाठी आपणास क्रेडिट कार्ड वापरताना काही अडचणी येऊ नयेत म्हणून काही टिप्स देत आहोत.
Next
आपला देश हळूहळू कॅशलेस इकॉनॉमीकडे वळतोय. अशातच प्लास्टिक मनी म्हणजेच क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सचा प्रयोग वाढत आहे. यासाठी आपणास क्रेडिट कार्ड वापरताना काही अडचणी येऊ नयेत म्हणून काही टिप्स देत आहोत.
* रिसर्च करा
सर्वप्रथम क्रेडिट कार्ड घेण्याअगोदर चांगल्याप्रकारे रिसर्च करा. त्यातील सर्व लहानसहान गोष्टी जाणून घ्या.
* कायम संपूर्ण बिल भरा
कायम संपूर्ण बिल भरणे ही क्रेडिट कार्डमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. थोडीही उसनवारी राहू देऊ नका. असे केल्याने मागील बिल अजून जास्त वाढून येते.
* सरळ भरणा करा
कित्येकदा बिल भरणा करण्याची तारीख निघून जाते आणि क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची आठवण राहत नाही. अशावेळी अतिरिक्त चार्जपासून वाचण्यासाठी सरळ भरण्याचा पर्याय निवडावा.
* क्रेडिट स्कोर
क्रेडिट स्कोरचे सध्या खूपच महत्त्व आहे. यासाठी क्रेडिट स्कोर कधीही ढासळू देऊ नका आणि यासाठी क्रेडिट कार्डचा योग्य आणि वेळेवर भरणा करावा.