‘अलिशा अब्दुल्ला’ - भारताची पहिली महिला रेसिंग चॅम्पियन !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2016 07:14 PM2016-03-29T19:14:37+5:302016-03-29T12:14:37+5:30

चैन्नईतील तरूण युवती अलिशा अब्दुल्ला ही रेसिंगच्या क्षेत्रात स्वत:ला अव्वल सिद्ध करत आहे. 

'Alisha Abdullah' - India's first female racing champion! | ‘अलिशा अब्दुल्ला’ - भारताची पहिली महिला रेसिंग चॅम्पियन !

‘अलिशा अब्दुल्ला’ - भारताची पहिली महिला रेसिंग चॅम्पियन !

Next
न्नईतील तरूण युवती अलिशा अब्दुल्ला ही रेसिंगच्या क्षेत्रात स्वत:ला अव्वल सिद्ध करत आहे. चाकांसोबत खेळ करणारी ती रॉकस्टार ठरली आहे. तेरा वर्षांची असताना पासून ती रेसिंगच्या क्षेत्रात काहीतरी एकदम हटके करायचे हे ठरवूनच आली होती. तिचे वडील आर. ए. अब्दुल्ला हे देखील उत्तम रेसर होते. ११ वर्षीय अलिशा जेव्हा सर्व प्रकारच्या रेस जिंकली तेव्हा सर्व जगाचे लक्ष तिच्याकडे वळले. आणि वय वर्षे १३ ला तिने नॅशनल लेव्हल फॉर्म्युला कार रेसिंगच्या ओपन क्लासमध्ये ‘एमआरएफ नॅशनल गो-कार्टिंग चॅम्पियनशिप’ आणि ‘बेस्ट नोव्हाईस अ‍ॅवॉर्ड’ जिंकला. 
alisha

alisha
बाईक रेसिंगचा प्रवास :
 जेव्हा ती १५ वर्षांची झाली तेव्हा तिने तिचा मार्ग  सुपर बाईक रेसिंगकडे वळवला. २००४ मध्ये ती केवळ ‘जेके टायर नॅशनल रेसिंग चॅम्पियनशिप’ पाचव्या क्रमांकाववर आली एवढेच नाही तर तिने रेसींगच्या इतर प्रकारांमध्ये देखील सहभाग घेतला. तिच्या वडिलांनी तिचा सुपर बाईक रेसिंगमधील इंटरेस्ट पाहून त्याच प्रकाराला पुढे नेण्याचा विचार केला. २०१० मध्ये अलिशा चारचाकी गाड्यांकडे वळली. दुचाकी वाहनासोबत तिच्या अपघात झाल्यानंतर तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की,‘संपूर्णपणे पुरूषी वर्चस्वाखालील या खेळात पुरूषांचे इगो माझ्यात मार्गात आले. अनेकवेळेस मुलगी पुढे जातीये हे पाहून त्यांनी माझ्या गाडीला अपघातही केला. न घाबरता त्यांना मी पुन्हा ठामपणे उभी राहून त्यांना उत्तर दिले. मला बाईक्स आवडत असूनही मग मी बाईक्स न चालवण्याचे ठरवले.’ 
alisha
चित्रपटात डेब्यू :
 क्रीडा क्षेत्रात अलिशाला आलेल्या अनुभवानंतर तिने चित्रपटात डेब्यू करण्याचा निर्णय घेतला. ती २००४ मध्ये तमीळ चित्रपट ‘इरंबू कुथीराई’ यात काम केले. यावर्षीही ती एका चित्रपटासाठी काम करत आहे. तिला ब्युटी क्वीन बनलेलं पाहिल्यानंतर सर्व जगानेच आश्चर्य व्यक्त केले. पण याबद्दल ती म्हणते,‘तुम्ही एकदा काही करायचे ठरवले ना की, मग तुम्हाला कुठलीच गोष्ट कठीण नसते. मी देखील निराश झाले होते. पण काही गोष्टींनी मला खुप स्ट्राँग केले.

Web Title: 'Alisha Abdullah' - India's first female racing champion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.