...आणि हरभजन भडकला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2016 11:58 PM2016-03-29T23:58:00+5:302016-03-29T17:02:18+5:30
सेलिब्रिटींना डोक्यावर घेणारे चाहते असतात तसेच काही डिवचणारे, अभद्र बोलणारे महाभागही असतात. भज्जी अर्थात हरभजन सिंह याचा अशाच एका महाभागाशी पाला पडला आणि मग काय, भज्जी जाम भडकला.
Next
सेलिब्रिटींना डोक्यावर घेणारे चाहते असतात तसेच काही डिवचणारे, अभद्र बोलणारे महाभागही असतात. भज्जी अर्थात हरभजन सिंह याचा अशाच एका महाभागाशी पाला पडला आणि मग काय, भज्जी जाम भडकला. हरभजन सिंह टी-२० वर्ल्ड कपमध्ये तर आहे. मात्र आत्तापर्यंत त्याला प्लेइंग इलेवनमध्ये संधी मिळालेली नाही. हे पाहून एका टिष्ट्वटर युजरने हरभजनला चांगलेच डिवचले. ‘भाई तेरा इंडिया टूर कैसा चल रहा है, मजा आ रहा होगा? फ्री के हॉटेल, लंच, डिनर, सब कुछ. मस्त लाइफ है’ असे टिष्ट्वट या युजरने केले. हे टिष्ट्वट वाचून भज्जीचा पारा चांगलाच चढला. त्याने या युजरला जशाच तसे उत्तर दिले. भज्जीने लिहिले,‘हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार.. और तुम उनमें से एक हो..’
या टिष्ट्वटनंतर भज्जी शांत झाला. मग काय, नंतर भज्जीच्या चाहत्यांनी मोर्चा सांभाळला. भज्जीविरूद्ध अभद्र टिष्ट्वट करणाºया त्या युजर अनेकांनी चांगलेच फैलावर घेतले.
या टिष्ट्वटनंतर भज्जी शांत झाला. मग काय, नंतर भज्जीच्या चाहत्यांनी मोर्चा सांभाळला. भज्जीविरूद्ध अभद्र टिष्ट्वट करणाºया त्या युजर अनेकांनी चांगलेच फैलावर घेतले.
@harbhajan_singh Bhai, tera India tour kaisa chal raha hai ? Mazaa aa raha hoga ? Free ke hotels, lunch, dinner, sab kuuch. Mast life hai
......................
Hathi chala bazar kutte bokke hazar... U r one of them