ANTI VALENTINE'S WEEK : स्लॅप डे, किक डे, ब्रेक-अप डे -प्रेमाचा ज्वर कमी करणाऱ्या दिवसांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2017 01:19 PM2017-02-12T13:19:58+5:302017-02-12T18:51:13+5:30

व्हॅलेंटाईन्स दिनाच्या एकदम विरुद्ध असा हा आठवडा असतो. विशेष म्हणजे १४ फे ब्रुवारीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे १५ फे ब्रुवारीपासून त्याला सुरुवात होते.

ANTI VALENTINE'S WEEK: Slap Days, Kick Day, Break-Up Day | ANTI VALENTINE'S WEEK : स्लॅप डे, किक डे, ब्रेक-अप डे -प्रेमाचा ज्वर कमी करणाऱ्या दिवसांची यादी

ANTI VALENTINE'S WEEK : स्लॅप डे, किक डे, ब्रेक-अप डे -प्रेमाचा ज्वर कमी करणाऱ्या दिवसांची यादी

Next
गचा संपूर्ण आठवडा तुमच्याभोवती सतत प्रेमाच्या आणि केवळ प्रेमाच्या गप्पा, गोष्टी, चर्चा, वातावरण राहिले असेल. फुले, टेडी, चॉकलेट असं सगळं कसं गुलाबी-गुलाबी झाले असेल ना! पण आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी हा ‘व्हॅलेंटाईन्स डे’ अपेक्षेप्रमाणे ‘ग्रेट’ किंवा ‘यशस्वी’ ठरला नसेल.

अनेकांनी हिंमत करून आवडणाऱ्या मुलीला प्रोपोज केले असेल मात्र त्यांना साफ नकार मिळाला असेल किंवा दुसऱ्याच दिवशी ब्रेक-अपही झाला असेल. प्रेमाची सुरुवात होण्यापूर्वीच त्याचा अंत झाला असेल. तुम्ही एवढ्या प्रेमाने दिलेले गिफ्ट समोरच्या व्यक्तीने आवडले नाही म्हणून फेकूनही दिले असेल. ज्या लोकांना वाटते की, व्हॅलेंटाईन वीकमध्ये ‘प्रेमाचा नको तेवढा उदोउदो केला जातो’ त्यांच्यासाठी ‘अँटी-व्हॅलेंटाईन वीक’ साजरा केला जातो. 

हो खरंच! व्हॅलेंटाईन्स दिनाच्या एकदम विरुद्ध असा हा आठवडा असतो. विशेष म्हणजे १४ फेब्रुवारीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे १५ फे ब्रुवारीपासून त्याला सुरुवात होते.

त्याचा पहिला दिवस म्हणजे ‘स्लॅप डे’. त्यानंतर किक डे, परफ्युम डे, फ्लर्टिंग डे, कन्फेशन डे, मिसिंग डे आणि अखेर ब्रेक-डे असा संपूर्ण हा ‘अँटी-व्हॅलेंटाईन वीक’असतो. थोडक्यात काय तर प्रेमाचा ज्वर कमी करणारा हा आठवडा असतो. कारण प्रत्येकासाठी ‘व्हॅलेंटाईन्स डे’ फलदायी ठरेल, असे नाही.

१५ फेब्रुवारी - स्लॅप डे
१६ फेब्रुवारी - किक डे
१७ फेब्रुवारी - परफ्युम डे
१८ फेब्रुवारी - फ्लर्टिंग डे
१९ फेब्रुवारी - कन्फेशन डे
२० फेब्रुवारी - मिसिंग डे
२१ फेब्रुवारी - ब्रेक-अप डे

आता या प्रत्येक दिवशी काय करत असतात ते पाहू...

* स्लॅप डे - १५ फेब्रुवारी

Slap

स्लॅपचा शब्दश: अर्थ तर चापट मारणे असा होता. मात्र या दिवशी रागात किंवा चीड धरून चापट मारायची नसते. तुम्ही घेतलेल्या चुकीच्या निर्णयासाठी स्वत:लाच त्याची जाणीव करून देण्याचा हा दिवस असतो. म्हणजे तुमच्या प्रेमाचा प्रस्ताव नाकारला गेला असेल तर त्या व्यक्तीला विसरण्यासाठी स्वत:ला समजावून सांगा.
* किक डे - १६ फेब्रुवारी

Kick Day


या दिवशी कोणाला लाथ मारायची नसते तर तुमच्या जीवनात ज्या लोकांशी तुम्हाला नाते ठेवायचे नाही त्यांना तुमच्या आयुष्यातून बाद करण्याचा हा दिवस. व्हॅलेंटाईन्स डे’नंतर दोन दिवसांनी तो साजरा केला जातो.
* पर्फ्युम डे - १७ फेब्रुवारी

¨¸f°fd³fCX¸f

संपूर्ण ‘व्हॅलेंटाईन्स वीक’मध्ये जर आयुष्यात प्रेमाचा गंध न दरवळलेल्या लोकांसाठी हा दिवस असतो. दरवर्षी १७ फे ब्रुवारी रोजी पर्फ्युम डे साजरा करण्यात येतो. या दिवशी तुम्ही तुम्हाला आवडणारा एखादा छान पर्फ्युम खरेदी करू शकता. त्याच्या सुगंधामध्ये प्रेमाचे दु:ख विसरणे सोपे जाईल.
* फ्लर्टिंग डे - १८ फेब्रुवारी​​

flierting

अजूनही प्रेमाची आशा धरून बसलेल्यांसाठी हा एक प्रकारे ‘सेकंड चान्स’ घेण्याचा दिवस असतो. आवडत्या व्यक्तीशी फ्लर्टिंग करून हळुवारपणे प्रेमाची मागणी करण्याचा हा दिवस. फ्लर्टिंग ही काही फार गंभीर नसते. त्यामुळे कोणी नकार जरी दिला तरी जास्त दु:ख मानण्याची गरज नाही.
* कन्फेशन डे- १९ फेब्रुवारी

Confession

प्रेम आंधळे असते असे म्हणतात; परंतु प्रेमात खरेपणा असणे महत्त्वाचे. त्यामुळे तुमच्या आवडत्या व्यक्तीपासून जर तुम्ही काही गोष्ट लपवून ठेवली असेल किंवा सांगितली नसेल तर ती आज सांगण्याचा दिवस आहे. ‘कन्फेशन डे’ला सगळे काही खरे सांगायचे असते. असे करणे कदाचित तुम्हाला अवघड वाटेल पण प्रेमाला सत्याचा आधार लागतो.
* मिसिंग डे - २० फेब्रुवारी

Missung day

कितीही नाही म्हटले तरी आपल्या प्रियजणांची आठवण आपल्याला येतच असते. त्यांनी जरी आपल्या प्रेमाचा स्वीकार केला नसला तरी त्यांच्या आठवणी कायम आपल्यासोबत असतात. त्याच आठवणींना उजाळा देण्याचा हा दिवस. तुमच्या प्रियकर/प्रेयसीच्या आठवणींमध्ये रमण्याचा हा दिवस असतो.
* ब्रेक अप डे - २१ फेब्रुवारी

Break up

व्हॅलेंटाईन वीकचे वातावरणच असे असते की, आपल्याला प्रेमात पडावेसे वाटते. कोणाची तरी आपल्याला साथ हवी असे वाटते; पण ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या सात दिवसांनंतर स्पष्ट होते की, ही रिलेशनशिप टिकणार की नाही? नाते बिघडून तुटण्यापेक्षा एका चांगल्या टप्प्यावर ते सोडून देणे कधीही चांगले. ‘ब्रेक अप डे’ला आपल्याला मागे जखडून ठेवणाऱ्या नात्यांना रामराम ठोकायचा असतो. 

Web Title: ANTI VALENTINE'S WEEK: Slap Days, Kick Day, Break-Up Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.