​आता आधार कार्ड शिवाय ‘या’ दोन योजनांच्या लाभापासून राहाल वंचित !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2017 12:44 PM2017-06-04T12:44:11+5:302017-06-04T18:18:05+5:30

विविध क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तसेच विविध सरकारी सेवांचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड हळूहळू अनिवार्य होत चालले आहे.

Apart from the benefit of the two schemes, the Aadhar card is deprived! | ​आता आधार कार्ड शिवाय ‘या’ दोन योजनांच्या लाभापासून राहाल वंचित !

​आता आधार कार्ड शिवाय ‘या’ दोन योजनांच्या लाभापासून राहाल वंचित !

Next
विध क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तसेच विविध सरकारी सेवांचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड हळूहळू अनिवार्य होत चालले आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार रॉकेल खरेदीवरील सबसिडीसाठी आणि जे लोकं अटल पेन्शन योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना आता आधार कार्डद्वारे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 
सबसिडीच्या लाभ घेण्यासाठी सरकारने ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. अटल पेंशन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर १५ जूनपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. आधार कार्ड सोबतच रेशन कार्ड, ड्राइविंग लायसेंस, मतदार ओळखपत्र, फोटो सोबतच शेतकरी पासबूक, मनरेगाच्या अंतर्गत मिळालेलं जॉब कार्ड ही कागदपत्रदेखील अनिवार्य असणार आहेत.  

Web Title: Apart from the benefit of the two schemes, the Aadhar card is deprived!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.