मऊसूत केस आणि सुंदर त्वचेसाठी मेथीचा रस आणि लेप लावा.
By admin | Published: June 7, 2017 06:18 PM2017-06-07T18:18:42+5:302017-06-07T18:26:27+5:30
सौंदर्याच्या संबंधित अनेक समस्यांवर मेथीची भाजी आणि मेथ्या या उत्तम औषधही आहेत.
- मृण्मयी पगारे.
कडूसर चवीची मेथीची भाजी अनेकांना जेवणात रोज दिली तरी चालते. इतकी मेथीची भाजी प्रिय आहे. मेथीच्या भाजीनं तोंडाला चव येते. इतकंच कशाला मेथीचं बी म्हणजे मेथ्या त्याही अनेक पदार्थांना चव आणतात. ताकाच्या कढीत फोडणीला मेथ्यांचे दाणे घातल्यास वेगळीच चव येते. डिंकाच्या लाडूत मेथ्यांची पावडर मिसळल्यास लाडूची चव आणि गुणवत्ता दोन्हीही वाढते. तसेच या मेथ्या भिजत घालून त्यांना मोड आणून आंबट गोड आणि थोडीशी कडूसर चवीची उसळही छान लागते. पण मेथीची भाजी आणि मेथ्या या काही फक्त खाण्यापुरत्याच नसून त्याचे अनेक औषधी गुणधर्मही आहे. तसेच सौंदर्याच्या संबंधित अनेक समस्यांवर मेथीची भाजी आणि मेथ्या या उत्तम औषधही आहेत.
मेथी आणि आरोग्य
* मेथीचा उपयोग ताप उतरण्यासाठी होतो.
* पोटाच्या तसेच श्वसनाच्या विकारातही मेथीचा उपयोग होतो.
* मेथीमध्ये खनिजं आणि जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात असतात. आणि म्हणूनच मेथी आणि मेथ्यांचा उपयोग खाण्यासोबतचं इतर अनेक कारणांसाठीही होतो.
* अंगाला येणारी घामाची दुर्गंधी आणि मुखदुर्गंधी घालवण्यासाठी मेथीच्या पानाचा उपयोग खूपच फायदेशीर ठरतो.
* मेथीच्या भाजीमुळे बाळांतिणीच्या दुधातही वाढ होते.