तेच ते टॉप्स वापरून बोअर झालात का? मग हे 10 प्रकारचे टॉप्स वापरून बघा. टॉप्स घेण्याचा आणि घालण्याचा कधीच कंटाळा येणार नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 06:45 PM2017-07-19T18:45:06+5:302017-07-19T18:51:52+5:30
एकाच प्रकारचे टॉप्स वापरून बोअर झाला असाल तर टॉप्सचे 10 पर्याय आहेत.. ट्राय तर करा!
- मोहिनी घारपुरे-देशमुख
टॉप्सची व्याख्या करायची झाल्यास ‘ आॅल सीझन फॅशन स्टेटमेण्ट’ अशी करता येईल. या टॉप्समध्ये सध्या अनेक प्रकार मिळ्तात. साध्या लूकपासून मॉर्डन-फॅशनेबल लूक कॅरी करायचा असेल तर टॉपशिवाय पर्याय नाही. एकाच प्रकारचे टॉप्स वापरून बोअर झाला असाल तर टॉप्सचे 10 पर्याय आहेत.. ट्राय तर करा!
1. ट्यूब टॉप
शोल्डरलेस, स्लीव्हलेस असलेले हे टॉप्स खूपच सेक्सी दिसतात. विशेषत: छातीलगत हे टॉप्स अत्यंत फिट असतात. एखाद्या ट्यूबप्रमाणे हे टॉप्स शरीराचा वरचा भाग कव्हर करतात म्हणून त्यांना ट्यूब टॉप्स असं म्हटलं जातं. कॉर्पोरेट लूक कॅरी करताना अनेकदा सूटच्या आतमध्ये एखादा ट्यूब टॉप घालून फॅशन केली जाते.
10. प्रिण्टेड टॉप्स
तुम्ही खूप फॅशनेबल नसाल पण तरीही थोडंफार आधुनिक राहाणी तुम्हाला आवडत असेल तर बाजारात मिळणाऱ्या प्रिण्टेड टॉप्सचाही पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरेल. हे टॉप्स छान दिसतात. मात्र काळजी एवढीच घ्या की तुमच्या अंगावर योग्य मापात बसेल असाच टॉप निवडा नाहीतर बरेचदा हे टॉप गबाळे दिसू शकतात.