तुम्ही मॉर्डन किचनचे चाहते आहात का? मग तुमच्या किचनमध्ये या 4 गोष्टी आहेत का? आवडल्या असतील तर आॅनलाइन मागवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2017 04:04 PM2017-07-14T16:04:48+5:302017-07-14T16:04:48+5:30

किचनच्या मॉडर्न लूकमध्ये भर घालणारे काही भन्नाट प्रकार हे तुमच्या कामास येवू शकतात.

Are you a fan of Modern Kitchen? So do these 4 things in your kitchen? If you like, online! | तुम्ही मॉर्डन किचनचे चाहते आहात का? मग तुमच्या किचनमध्ये या 4 गोष्टी आहेत का? आवडल्या असतील तर आॅनलाइन मागवा!

तुम्ही मॉर्डन किचनचे चाहते आहात का? मग तुमच्या किचनमध्ये या 4 गोष्टी आहेत का? आवडल्या असतील तर आॅनलाइन मागवा!

Next



- सारिका पूरकर-गुजराथी

स्वयंपाकघरातील चमचा-विळीपासून तर कढई, ताटं-वाट्या, पेले, तांबे, सराटे, झारे, सोलणं, तवे, पोळपाट-लाटणे, पातेली या साऱ्या भांड्यांनी मेकओव्हर केलाय. भरपूर, असंख्य नवनवीन आकार, प्रकारात ती उपलब्ध झाली आहेत. भांडीच नाही तर मिक्सर, ग्लास कूकटॉप, इंडक्शन शेगडी, ओवन, मायक्रोवेव्ह, ंराईस कूकर्स, फूडप्रोसेसर या इलेक्ट्रिक वस्तूंमध्येही अत्याधुनिक सोयी बघायला मिळताहेत. यासोबतच कडधान्यांना मोड आणणारे स्प्राऊट मेकर्स, पॉपकॉर्न फोडणारे पॉपकॉर्न मेकर, सॅलॅड आणि भाज्या कापणारे विविध आकारातील चॉपर्स, फेसाळणारी कॉफी बनवणारे कॉफी मेकर्स, काळीमिरी पूड करणारे पेपर क्रशर, पास्ता-नूडल्स मेकर, लसूण-मिरची क्रशर वगैरे वगैरे.. यादी बरीच लांबलचक आहे. स्वयंपाकघराला २१ व्या शतकाचा साज चढला आहे. साहजिकच प्रत्येक महिलेलाच आपल्या किचनमध्ये ही व्हरायटी हवी असते. एकतर या साधनांमुळे तिचे कष्टही काही प्रमाणात कमी झालेय शिवाय किचनला एक फ्रेश आणि मॉडर्न लूकही मिळाला आहे. किचनच्या या मॉडर्न लूकमध्ये आणखी भर घालणारे काही भन्नाट प्रकार दाखल झाले आहेत ते तुम्हाला माहित आहेत का? हे ही तुमच्या खूप कामास येवू शकतात.


बर्ड फोर्क

मिठाई, फळांचे तुकडे खाण्यासाठी एरवी टूथपिक किंवा फोर्क वापरतात. स्टीलचे तेच ते फोर्क पाहून कंटाळले असाल तर फूड ग्रेड प्लास्टिकचे फोर्क बाजारात नवीन रुपात दाखल झाले आहेत. हे फोर्क कलरफूल आहेत शिवाय यांचे हॅण्डल म्हणून पक्ष्यांचे आकार आहेत, म्हणून ‘बर्ड फोर्क’ म्हणून ते ओळखले जाताहेत. शिवाय हे फोर्क ठेवण्यासाठी झाडाच्या आकाराचे स्टॅण्डही सोबत आहे. काम झालं की हे फोर्क या स्टॅण्डवर लावून ठेवले की झाडावर बसलेले रंगीबिरंगी पक्षीच आपल्याला दिसतात. डायनिंग टेबलवर हा बर्ड फोर्कचा स्टॅण्ड ठेवला की टेबललाही खूप फ्रेश लूक मिळतो. फोर्कप्रमाणेच कार्टून स्पून्सही आले आहेत. कार्टून कॅरॅक्टरचे हॅण्डल या स्पूनसाठी आहे.

 

          

Web Title: Are you a fan of Modern Kitchen? So do these 4 things in your kitchen? If you like, online!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.