ताठ कॉलरचा जमाना गेला पण का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 06:14 PM2017-12-01T18:14:50+5:302017-12-01T18:29:48+5:30

ड्रेसची किंवा शर्टची ताठ कॉलर म्हणजे आपला प्रत्येकाचा एकदम प्रेस्टीज पॉइंटच. आजही कॉलर ताठ असावी यासाठीच आपला हट्ट. या कॉलरनेही काळानुरूप नवं नवं रूप घेतलं आणि आपल्यातला ताठपणा कमी करत कॉलरही नम्रच झाली.

Are you known about amusing history of collar | ताठ कॉलरचा जमाना गेला पण का?

ताठ कॉलरचा जमाना गेला पण का?

googlenewsNext
ठळक मुद्दे* कधी या कॉलर्स अटॅचेबल तर कधी या कॉलर्स डीटॅचेबल. कधी या ताठ, कधी या गोलाकार, कधी स्टॅण्ड कॉलर तर कधी स्प्रेड कॉलर. याशिवाय चिक्कार डिझायनर कॉलर्स असतात.* 18 व्या शतकाच्या मध्यात डिटॅचेबल कॉलर्स जन्माला आल्या. या कॉलर्सचं डिटॅचेबल असणं हे केवळ एक सोय म्हणूनच होतं.* साधारण 1901 - 1914 या एवडवर्डीअन इरा म्हणून ओळखल्या जाणा-या कालखंडात तर आॅर्नामेण्टल कॉलर्स, अर्थात, कॉलरवरून मोठी जाड चेन, सोनसाखळी, चोकर वगैरे परिधान केल्या जाऊ लागल्या.

 

मोहिनी घारपुरे -देशमुख 

प्रत्येक कापडाचा पोत निराळा, प्रत्येक कापडाचा रंग निराळा आणि म्हणूनच तर प्रत्येकच पोषाखाची स्टाइलही निरनिराळी.
फॅशनच्या दुनियेत प्रत्येक कपडा इतर कपड्यांपेक्षा वेगळा .आपली खास शैली मिरवणारा आणि त्यासाठी     हरत-हने आपलं स्वत:चं सौंदर्य खुलवणारा.

कोणत्याही पोषाखांच्या दुकानात सहज एक चक्कर मारा आणि तिथल्या शेकडो कपड्यांच्या शेकडो शैली, रंग, पोत निरखून पाहा. प्रत्येक पोषाखांच सौंदर्य वेगवेगळं असतं. आपलं असं खास वैशिष्ट्य असतं प्रत्येक कपड्याचं. उदा.एखाद्या कुर्तीची कॉलर छान, एखाद्या शर्टच्या बाह्यांची स्टाइल छान, एखाद्या सलवारीचं कापड कसं तलम, झुळझुळीत, एखाद्या फ्रॉकची फ्रील छान .प्रत्येक पोषाखाची खूबी दडलेली असते त्याच्या एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण भागात. कॉलरमध्येही कपड्याचं सौंदर्य दडलेलं असतं. ही कॉलरची फॅशनही टप्प्याटप्प्यानं बदलत गेली आहे.
ताठ कॉलरचा जमाना गेला

 

 

 

 

ड्रेसची किंवा शर्टची ताठ कॉलर म्हणजे आपला प्रत्येकाचा एकदम प्रेस्टीज पॉइंटच.आजही कॉलर ताठ असावी यासाठीच आपला हट्ट. या कॉलरनेही काळानुरूप नवं नवं रूप घेतलं आणि आपल्यातला ताठपणा कमी करत कॉलरही नम्रच झाली

नम्रतेने जो वाकतो त्याला लोक नेहेमीच आपलंस करतात . अगदी तीच जादू कॉलर्सबद्दलही झाली. कॉलरमध्ये इतक्या फॅशन्स, इतके प्रकार आले अन बघता बघता ते प्रचंड लोकप्रियही झाले . कधी या कॉलर्स अटॅचेबल तर कधी या कॉलर्स डीटॅचेबल. कधी या ताठ, कधी या गोलाकार, कधी स्टॅण्ड कॉलर तर कधी स्प्रेड कॉलर. याशिवाय चिक्कार डिझायनर कॉलर्स असतात. एखादा ड्रेस सुंदर दिसण्याचं सगळं श्रेय त्या ड्रेसची कॉलरच पटकावून जाते .
राणी एलिझाबेथच्या काळात कपड्यांना गळ्याभोवती झालर लावलेली असायची, या झालरचंच पुढे कॉलरमध्ये रूपांतर झालं. खरंतर ही झालर म्हणजे नुसता दिखावाच होता. त्याचा उपयोग फारसा काही नव्हताच. पण तरीही या चैनीसाठी तब्बल सहा यार्ड स्टार्च्ड कपडा वापरला जाई आणि त्यावर तब्बल 600 घड्या केल्या जात. गळ्यापासून चक्क 8 इंचांपर्यंत लांब एवढी ही झालर पोषाखावर लावलेली असायची असा संदर्भ दी टाईम ट्रॅव्हलर गाइडमध्ये सापडतो. काही फॅशन अभ्यासकांच्यामते त्याकाळात प्रत्येक पोषाखावर जोडण्यात आलेल्या अशा झालर म्हणजे एक प्रकारचं वेडच (क्रेझ) होतं.

त्यानंतर 18 व्या शतकाच्या मध्यात डिटॅचेबल कॉलर्स जन्माला आल्या. या कॉलर्सचं डिटॅचेबल असणं हे केवळ एक सोय म्हणूनच होतं. एरवी पुरूषांच्या शर्टला असलेली कॉलर दिवसभराच्या रामरगाड्यात मळून जायची, ती साफ करणं काहीसं कठीणच असायचं, म्हणूनच केवळ स्वच्छतेसाठी आणि इस्त्री करणं, स्टार्च करणं सोपं जावं म्हणून या कॉलर्स डीटॅचेबल स्वरूपात करण्यात आल्या. शिवाय, त्यामुळे संपूर्ण शर्ट धुणं, इस्त्री करणंही टळायचं.

 

आणखी एक रंजक माहिती म्हणजे, साधारण 1901 - 1914 या एवडवर्डीअन इरा म्हणून ओळखल्या           जाणा-या कालखंडात तर आॅर्नामेण्टल कॉलर्स, अर्थात, कॉलरवरून मोठी जाड चेन, सोनसाखळी, चोकर वगैरे परिधान केल्या जाऊ लागल्या. अनेक ठिकाणी तर कॉलरऐवजी, या दागिन्यांचाच कॉलर म्हणून उपयोग केल्याचेही संदर्भ आढळतात.

 

 

 

 

Web Title: Are you known about amusing history of collar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.