अशोक सराफ यांना संस्कृती कलादर्पणचा सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2016 04:23 PM2016-04-26T16:23:41+5:302016-04-26T21:53:41+5:30
अर्चना नेवरेकर फाउंडेशन प्रस्तुत संस्कती कलादर्पण गौरव रजनी २०१६ हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळा नुकताच गोरेगाव येथील नेस्को मैदानात उत्साहात पार पडला
Next
अ ्चना नेवरेकर फाउंडेशन प्रस्तुत संस्कती कलादर्पण गौरव रजनी २०१६ हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळा नुकताच गोरेगाव येथील नेस्को मैदानात उत्साहात पार पडला. या सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संस्कृती कलादर्पणचा सर्वश्रेष्ठ कलागौरव या पुरस्काराने गौरवविण्यात आले. या पुरस्काराने मी पुन्हा एकदा रसिकांच्या ओझ्याखाली दबलो गेलो असल्याचे अशोक सराफ यांनी सांगितले.
या पुरस्कारासाठी माझा विचार केल्याबद्दल धन्यवाद, माझ्या ४५ वर्ष अभिनय कारकिर्दीमध्ये रसिकांनी मला अमाप प्रेम दिले त्याबद्दल प्रेक्षकांचे मी आभार मानतो. आजही रसिक मायबाप मला पसंत करतात हे मी माझे भाग्यच समजतो. अशी भावना अशोक सराफ यांनी पुरस्कार घेताना व्यक्त केली.
पुरस्कार सोहळ्यात ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकाने तर ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाने बाजी मारली.