​ अ‍ॅँड्रॉइडवरील हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2016 05:37 PM2016-11-22T17:37:44+5:302016-11-22T17:37:44+5:30

संगणकापाठोपाठच आता अ‍ॅँड्रॉइड मोबाईलवरदेखील मोठ्या प्रमाणात हल्ले वाढले आहेत. या वर्षीच्या सुरुवातीला क्विकहिलच्या प्रयोगशाळेत १७८ नवे मालवेअर्स आढळून आलेत...

Attacks on android | ​ अ‍ॅँड्रॉइडवरील हल्ले

​ अ‍ॅँड्रॉइडवरील हल्ले

googlenewsNext
गणकापाठोपाठच आता अ‍ॅँड्रॉइड मोबाईलवरदेखील मोठ्या प्रमाणात हल्ले वाढले आहेत. या वर्षीच्या सुरुवातीला क्विकहिलच्या प्रयोगशाळेत १७८ नवे मालवेअर्स आढळून आलेत. हे मालवेअर्स पसरण्याचे प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढले आहे. यामध्येही रॅन्समवेअर्सचाही समावेश आहे.

अ‍ॅँड्रॉइडवर मालवेअर्स कसे करतात हल्ले
नोटिफिकेशन बारमधून कधीकधी अचानक फुलस्क्रीन जाहिरात येते. या जाहिरातीवर तुम्ही जोपर्यंत क्लिक करत नाहीत तोपर्यंत बॅक किंवा होमस्क्रीनचे बटण वापरता येत नाही. याच प्रकारे अनेक मालवेअर्स अ‍ॅपच्या माध्यमातून मोबाईलमध्ये शिरकाव करतात आणि छुप्या पद्धतीने माहिती चोरी करीत असतात. अनेक मालवेअर्स आपल्या मोबाईलमधील यंत्रणेचा वापर बिघडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपण जी क्रिया निवडतो ती न होता वेगळेच काही तरी होते. मोबाईल पेमेंट प्रणालीच्या माध्यमातून अनेकदा रॅन्समवेअर्स आपल्या मोबाइलमध्ये शिरकाव करतात.

काय काळजी घ्याल
* संगणकावर किंवा मोबाईलवर इंटरनेट वापरताना सुरक्षित संकेतस्थळांनाच भेट देणे.

* अनोळखी किंवा स्पॅममधील ई-मेल्स न पाहणे व ते तातडीने डिलीट करणे.

* अनोळखी स्रोतामधून अ‍ॅप किंवा कोणतीही फाइल्स किंवा माहिती स्वीकारू नये.

* संगणक किंवा मोबाईलमधील आॅपरेटिंग प्रणाली सतत अद्ययावत करत राहणे.

* अद्ययावत आॅपरेटिंग प्रणालीमध्ये जुन्या प्रणालीला त्रास देणाºया मालवेअर्सवर तोडगा काढलेला असतो. त्यामुळे आपल्या संगणकात आणि मोबाईलमध्ये आॅपरेटिंग प्रणालीची ताजी आवृत्ती असावी.

Web Title: Attacks on android

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.