अबब! दहा मिनिटांत ७० हॉट डॉग्ज फस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2016 01:38 PM2016-07-05T13:38:51+5:302016-07-05T19:08:51+5:30
जोई ‘जॉज्’ चेस्टनट नावाच्या व्यक्तीने सत्तर हॉट डॉग्ज खाऊन ‘मस्टर्ड येलो इंटरनॅशनल बेल्ट’ पटकावला.
Next
क णाचं खाणं मोजू नये असे म्हणतात. पण एखादा व्यक्ती जर काही मिनिटांमध्ये ७० हॉट डॉग्ज खाऊन फस्त करत असेल गोष्ट वेगळी आहे. जोई ‘जॉज्’ चेस्टनट नावाच्या व्यक्तीने स्वत:चाच विक्रम मोडित काढत सत्तर हॉट डॉग्ज खाऊन ‘मस्टर्ड येलो इंटरनॅशनल बेल्ट’ पटकावला. प्रतिस्पर्धी मॅट ‘द मेगाटोड’ स्टोनीला हरवत त्याने वार्षिक ‘जुलै फोर्थ इटिंग कॉटेंस्ट’ जिंकली.
कोनी आयलँड येथे होणाऱ्या या अनोख्या स्पर्धेत चेस्टनटने स्टोनीपेक्षा १७ हॉट डॉग्ज जास्त खाऊन मागच्या वर्षीच्या पराजयाचा वचपा काढला. सत्तर हॉट डॉग्जसह त्याने स्वत:चाच २०१३ साली केलेला दहा मिनिटांत ६९ हॉट डॉग्जचा विक्रम मोडला.
विजेता झाल्यावर तो म्हणाला की, गेल्या वर्षीचा पराभव माझ्या फारच जिव्हारी लागला होता. त्यामुळे यंदा अत्यंत त्वेषाने मी ही स्पर्धा जिंकायचीच या उद्देशाने आला होतो.
महिला विभागात लास वेगस स्थित मिकी सुडोने दहा मिनिटांत ३८ हॉट डॉग्स फस्त करून लगातार तिसºयांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. चेस्टनट आणि सुडो अशा दोन्ही विजेत्यांना प्रत्येकी दहा हजार डॉलर्सचे बक्षीस देण्यात आले.